• Home
  • लाईफस्टाईल
  • गोड खाण्याची तीव्र इच्छा होतेय ? मग हे आरोग्यदायी शुगर फ्री नारळाचे लाडू नक्की टेस्ट करा
लाईफस्टाईल

गोड खाण्याची तीव्र इच्छा होतेय ? मग हे आरोग्यदायी शुगर फ्री नारळाचे लाडू नक्की टेस्ट करा

Sugar free coconut ladoo made with natural sweeteners

Sugar Free Coconut Ladoo : गोड पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकाची असते. परंतु अनेक जण गोड खाणे टाळतात. आजकालची जीवनशैली पाहता प्रत्येक व्यक्ती त्यांच्या हेल्थसाठी पझेसिव्ह असतात. त्यामुळे अनेक जण तूप आणि साखरेचे पदार्थ खाणे टाळतात. असं असलं तरी देखील प्रत्येकाला कधी कधी गोड खाण्याची इच्छा तर असतेच. अशावेळी शुगरफ्री असे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. जसं कि नारळाचे विना शुगर असलेले लाडू. हा एक उत्तम पर्याय आहे.

नारळ हे शरीरासाठी फायदेशीर असते. ते शरीरासाठी ऊर्जा टिकवून ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत करते. नारळामध्ये नारळात भरपूर प्रमाणात फायबर, हेल्दी फॅट आणि खनिजे असतात,यामुळे शरीरात ऊर्जा टिकवून राहते. नारळाने बनवलेले लाडू फक्त चवदार नाही तर आरोग्यदायी असतात. आज आपण या लेखात जाणून घेऊया शुगरफ्री नारळाच्या लाडूची खास रेसिपी.

खजूर आणि नारळाचे लाडू

खजूर आणि नारळाचे लाडू बनवण्यासाठी तुम्ही सर्वात पहिले नारळ किसून घ्या. 1 कप सुख्या खोबऱ्याचा किस आपल्याला लागेल.यासह 1 कप चिरलेले किंवा मिक्सर मधून पेस्ट केले खजूर, 2 चमचा बारीक चिरलेले काजू किंवा बदाम, 1 चमचा तूप आणि अर्धा चमचा वेलची पूड हे साहित्य आपल्याला लाडू बनविण्यासाठी लागेल.

सर्वात पहिले चिरलेले किंवा खजूर ची तयार केलेली पेस्ट घ्या. एका पॅन मध्ये थोडे तूप घ्या. त्यामध्ये खजुरची बनवलेली पेस्ट टाका. आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिट परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये चिरलेले काजू किंवा बदाम, नारळाचा किस टाकून मिक्स करा. आणि त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण थोडे थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर या मिश्रणाचे थोडे थोडे लाडू वळून घ्या, आणि लाडू वळल्यानंतर त्यावर उरलेल्या नारळाचा किस टाका. आणि तुमचे खजूर नारळाचे लाडू तयार.

दूध आणि नारळाचे लाडू

जर तुम्हाला क्लासिक हेल्दी असे लाडू खाण्याची इच्छा असेल तर ही रेसिपी आहे खा तुमच्यासाठी या नारळ आणि दुधाच्या लाडू साठी 2 कप नारळाचा किस, 1 कप लो फॅट दूध, 3-4 चमचे कोकोनट साखर, 1 चमचा वेलची पूड, 1 टेबलस्पून तूप हे साहित्य घ्या.

एका पॅनध्ये तूप टाका. त्यानंतर ओल्या नारळाचा किस परतून घ्या. ओल्या नारळातील ओलावा निघून जाई पर्यंत हे नारळ परतून घ्या. त्यानंतर दूध टाका. आणि मंद आचेवर हे मिश्रण मिक्स होऊ द्या. त्यानंतर या मिश्रणात वेलची पूड टाकून एकजूट करा. हे मिश्रण लाडू बनवण्यासाठी घट्ट होई पर्यंत शिजवा. आणि त्यानंतर गॅस बंद करा. हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या. आणि त्याचे सुंदर असे लाडू बनवा. नारळाचे लाडू हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

हळदाची पाने : आयुर्वेदिक गुणांचा अनमोल खजिना हल्लीम (Garden Cress Seeds): आरोग्यासाठी नैसर्गिक सुपरफूड स्नायूंची ताकद वाढवायची? रोज खा हे ७ प्रोटीन सुपरफूड्स! स्ट्रॉबेरी: गोड लाल आरोग्यदायी फळ सुंठ (Dry Ginger): आरोग्याचा खजिना