Breaking News :
  • Home
  • आरोग्य
  • ऑनलाइन दागिने खरेदी करताय? सावधान! आर्टिफिशियल ज्वेलरी ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक
लाईफस्टाईल

ऑनलाइन दागिने खरेदी करताय? सावधान! आर्टिफिशियल ज्वेलरी ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक

Online Artificial Jewelry Health Risks
Online Artificial Jewelry Health Risks: तुम्ही देखील ऑनलाइन दागिने खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्वस्त आणि आकर्षक दिसणाऱ्या आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये आढळणारी धोकादायक भेसळ आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. जाणून घ्या नेमके प्रकरण काय आहे.

ऑनलाईन शॉपिंगचा ( Online Shopping) वापर, आज मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कपडे, इलेकट्रॉनिक्स, किराणा सामानापासून ते दागिन्यांपर्यंत अनेक वस्तू आता घरबसल्या मागवल्या जातात. मात्र, ऑनलाईन मिळणाऱ्या आर्टिफिशियल ज्वेलरीबाबत एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. काही बनावट दागिन्यांमध्ये आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या धातूंचे प्रमाण आढळून आले आहे. (Artificial Jewelry Health Risks)

हेही वाचा: मुंबईकरांनो लक्ष द्या! ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी; काय बंद, काय सुरू? जाणून घ्या कधीपासून सुरू होणार

कृत्रिम दागिने आकर्षक आणि कमी किमतीत उपलब्ध असल्यामुळे अनेक जण त्यांचा वापर करतात. मात्र, त्यामध्ये कॅडमियम आणि शिसे ( Lead) यांसारख्या हानिकारक धांतूंची भेसळ असल्यास त्वचेपासून शरीरातील अंतर्गत अवयवांपर्यंत त्याचा परिणाम होऊ शकतो.

तपासणीत धक्कादायक खुलासा

यूकेमध्ये करण्यात आलेल्या एका तपासणीत काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये कॅडमियमचे प्रमाण मर्यादेपेक्षा हजारो पटीने जास्त असल्याचे समोर आले.

नियमांनुसार, ज्वेलरीमध्ये कॅडमियमचे प्रमाण अत्यंत कमी असणे आवश्यक आहे. मात्र, काही उत्पादनांमध्ये हे प्रमाण तब्बल 9000 पट अधिक असल्याचे तपासणीत आढळले.

काही दागिने 925 सिल्व्हर म्हणून विकले जात होते. म्हणजेच ते 92.5 टक्के चांदीचे असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, तपासणीमध्ये त्यामध्ये चांदीऐवजी मोठ्या प्रमाणात घातक धातू असल्याचे आढळून आले.

याशिवाय एका ब्रेसलेटमध्येही कॅडमियमचे प्रमाण धोकादायक पातळीवर आढळले. त्यानंतर संबंधित उत्पादने बाजारातून मागे घेण्यात आली.

कॅडमियम शरीरासाठी किती धोकादायक?

तज्ज्ञांच्या मते, कॅडमियमसारख्या जड धातूंचा दीर्घकाळ संपर्क आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतो. यामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच काही परिस्थितींमध्ये कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

याशिवाय लिव्हरचे नुकसान, हाडे कमजोर होणे आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

कानातले आणि अंगठ्यांपासून अधिक धोका?

आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये (Artificial Jewelry) कानातल्यांचा धोका तुलनेने अधिक मानला जातो. कारण कानात छिद्र असल्याने दागिना थेट त्वचेच्या संपर्कात राहतो. त्यामुळे त्यातील धातू शरीरात जाण्याची शक्यता वाढते.

अंगठी, नेकलेस किंवा ब्रेसलेट यांचाही सतत वापर केल्यास त्वचेवर परिणाम होऊ शकतो.

ऑनलाइन ज्वेलरी खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच खरेदी करा.
उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाणपत्र तपासा.
अतिशय कमी किमतीत मिळणाऱ्या ज्वेलरीबाबत सावध राहा.
त्वचेवर खाज, लालसरपणा किंवा त्रास जाणवल्यास वापर थांबवा.

आर्टिफिशियल ज्वेलरी स्वस्त आणि आकर्षक असली तरी तिची गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे आहे. विशेषतः ऑनलाइन खरेदी करताना केवळ किंमत न पाहता सुरक्षिततेलाही प्राधान्य देणे गरजेचे आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts