Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • तुमच्या ‘या’ सवयीमुळे खराब होऊ शकतो बोन मॅरो! वेळेत सावध व्हा; नाहीतर गंभीर परिणाम
आरोग्य

तुमच्या ‘या’ सवयीमुळे खराब होऊ शकतो बोन मॅरो! वेळेत सावध व्हा; नाहीतर गंभीर परिणाम

Bone Marrow

Bone Marrow Health: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. जर तुम्हीही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत खाली दिलेल्या सवयींचा समावेश करत असाल, तर तुमचा बोन मॅरो धोक्यात येऊ शकतो. कसे ते जाणून घेऊया

आपल्या शरीरातील हांडांच्या आत असलेली अस्थिमज्जा (बोन मॅरो) Bone Marrow Health  ही एक अत्यंत महत्वाची रचना आहे. शरीरातील रक्स्तनिर्मितीची संपूर्ण जबाबदारी याच्यावर असते. त्यामुळे ती निरोगी राहणे खूप गरजेचे आहे.

हेही वाचा: मेष ते मीन या राशींच्या व्यक्तींसाठी काय आहे खास? वाचा तुमचं आजचं राशिभविष्य

बोन मॅरोमध्ये (Bone Marrow Health) असलेल्या विशेष स्टेम सेल्समुळे रक्तातील तीन महत्वाचे घटक तयार होतात. लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स. हे तिन्ही घटक शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असतात.

बोन मॅरोची मुख्य कार्ये काय आहेत? (Bone Marrow)

रेड ब्लड सेल्स (RBCs) तयार करणे

हे शरीरात ऑक्सिजन पोहोचवतात. यांची कमतरता असल्यास थकवा, अशक्तपणा आणि अॅनिमिया होतो.

व्हाइट ब्लड सेल्स (WBCs)

हे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि संसर्ग, बॅक्टेरिया व व्हायरसशी लढतात.

प्लेटलेट्स तयार करणे

जखम झाल्यावर रक्त गोठवण्यासाठी मदत करतात. प्लेटलेट्स कमी झाल्यास जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.

या मुख्य सवयी टाळा

धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन

त्यातील विषारी घटकांमुळे रक्तनिर्मितीत अडथळा येतो आणि पेशींची संख्या कमी होते.

मद्यपान

मद्य शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवते आणि रक्त तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.

घातक रसायनांचा संपर्क

कीटकनाशके किंवा औद्योगिक रसायनांमुळे अस्थिमज्जेचे नुकसान होऊ शकते.

अपूर्ण आहार

लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास अस्थिमज्जा (बोन मॅरो) कमकुवत होते.

संसर्गजन्य रोग

हिपॅटायटीस आणि एचआयव्ही सारख्या आजारांमुळे अस्थिमज्जेचे नुकसान होऊ शकते.

औषधांचा अति वापर

डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे किंवा स्टिरॉइड्स घेणे धोकादायक ठरू शकते.

निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?

संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
नियमित व्यायाम करा
स्वच्छता राखा

FAQs

1. बोन मॅरो म्हणजे काय?
उत्तर: बोन मॅरो (अस्थिमज्जा) ही हाडांच्या आतील मऊ ऊतक असून ती लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स तयार करण्याचे महत्त्वाचे काम करते.

2. कोणत्या सवयींमुळे बोन मॅरोचे नुकसान होऊ शकते?
उत्तर: धूम्रपान, तंबाखूचे सेवन, अतिमद्यपान, अपूर्ण आहार, घातक रसायनांचा संपर्क आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचा अति वापर यामुळे बोन मॅरोवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

3. बोन मॅरो निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
उत्तर: संतुलित आहार, लोह व जीवनसत्त्वयुक्त अन्न, नियमित व्यायाम, धूम्रपान व मद्यपान टाळणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे उपयुक्त ठरते.

4. बोन मॅरो कमकुवत झाल्याची लक्षणे कोणती असू शकतात?
उत्तर: सतत थकवा, अशक्तपणा, वारंवार संसर्ग होणे, सहज रक्तस्त्राव होणे किंवा जखम उशिरा भरून येणे ही काही संभाव्य लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts