Breaking News :
  • Home
  • Top News
  • 21 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवरून हटवलं; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, रुग्णालयात दाखल
ताज्या बातम्या

21 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवरून हटवलं; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, रुग्णालयात दाखल

Sonam Wangchuk
Sonam Wangchuk: दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी पहाटे नाट्यमय वळण मिळालं. तब्बल 21 दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेले पर्यावरणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटवत सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. या कारवाईनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला असून कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. जंतरमंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सोनम वांगचुक यांच्या प्रकृती बिघाड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड ( Sonam Wangchuk Health) होत होता. सलग 21 दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने डॉक्टरांनी तातडीने वैद्यकीय उपचारांची शिफारस केली होती. यासंदर्भात न्यायालयाच्या निर्देशांनुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: ISRO ला मोठा धक्का! 100 हून अधिक शास्त्रज्ञांनी दिले राजीनामे; नेमकं कारण काय?

पहाटे पोलीसांचा जंतरमंतरवर प्रवेश

पहाटेच्या सुमारास शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी जंतरमंतर (Jantar Mantar Protest) परिसरात प्रवेश करून आंदोलनस्थळाला वेढा घातला. त्यानंतर सोनम वांगचुक यांना ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात (Safdarjung Hospital) हलवण्यात आलं. या अचानक झालेल्या कारवाईमुळे आंदोलनकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी पोलिसांचा ताफा रोखण्याचाही प्रयत्न केला, मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली. Lokshevay

रस्त्यांवर बॅरिकेड्स पोलीस दल तैनात

कारवाईनंतर जंतरमंतर (Jantar Mantar Protest) परिसरातील सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. परिसरातील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले असून अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे. आंदोलकांना शांततेत परिसर रिकामा करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत असून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. (LS Marathi Live)

आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही कार्यकर्त्यांनी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप केला असून आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

हेही वाचा: अमित ठाकरे दिल्लीत जाणार! सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा.

वांगचुककडे डॉक्टरांच बारकाईने लक्ष

सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आंदोलनाला विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि काही राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या प्रकृतीवर सध्या सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. (LS Marathi News)

राजकीय वातावरण तापलं

या घडामोडींमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं असून, आंदोलन आणि पोलिसांच्या कारवाईवरून पुढील काही दिवसांत राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts