Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • सरकार आणि CJP मध्ये आज बैठक होणार ; मुद्द्यांवर होणार चर्चा
राजकारण

सरकार आणि CJP मध्ये आज बैठक होणार ; मुद्द्यांवर होणार चर्चा

Government Meeting
Government Meeting: सरकार आणि आंदोलन करणाऱ्या संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये आज महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. ही बैठक दुपारी १२.३० वाजता होणार असून, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

बैठकीत आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या विविध मागण्या आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याआधीही सरकारच्या प्रतिनिधींनी संबंधित नेत्यांशी संवाद साधला होता.

हेही वाचा: अखेर 26 दिवसांनंतर सोनम वांगचूक यांनी सोडलं उपोषण; सरकारसोबत चर्चेनंतर मोठा निर्णय

खर्गे यांची टीका

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. संसदेत येण्यापूर्वी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

खर्गे यांनी सोशल मीडिया पोस्ट

खर्गे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मोदींच्या व्हिडिओ संदेशावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, केवळ एकतर्फी संवाद करून चालणार नाही, तर संबंधित लोकांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष चर्चा होणे गरजेचे आहे.

आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. लाठीचार्ज करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतरच पुढील चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असेही त्यांनी सांगितले.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts