Amit Thackrey Sonam Wangchuk : देशातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा असलेल्या नीटमध्ये पेपरफुटी झाली, या गैरव्यवहाराच्या विरोधात राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर एक अभूतपूर्व आंदोलन पेटले आहे. या आंदोलनात पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी गेल्या २० दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. या संपूर्ण प्रकरणाला आता महाराष्ट्रातील राजकारणातून एक मोठी कलाटणी मिळाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्या या लढ्याला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. तर याच आंदोलना पाठिंबा देण्यासाठी अमित ठाकरे उद्या दिल्लीत दाखल होणार आहे, त्यामुळे वातवरण आणखी तापलंय…
जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांचे उपोषण :
नीट परीक्षेतील सावळागोंधळ समोर आल्यानंतर संपूर्ण देशातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली, तर काही विद्यार्थ्यांनी नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. अशा अत्यंत संवेदनशील आणि देशाच्या भवितव्याशी जोडलेल्या मुद्द्यावर लडाखचे प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या या आंदोलनाचा मुख्य उद्देश देशातील परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता परत आणणे आणि लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करणे हा आहे. म्हणजेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, पण राजीनामा तर सोडा हो, प्रधान या आंदोलनाकडे डुंकून पाहायला तयार नाही, आणि वरतून या आंदोलनाला देशविरोधी म्हणतायात, त्यामुळे आता शिक्षमंत्र्यांच्या बुद्धीची कीव येऊ लागलीय, असो…
अमित ठाकरे यांनी या मूळ उद्देशाचे स्वागत केले असून, सोनम वांगचुक [ Amit Thackrey Sonam Wangchuk ] यांच्यासारखी ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्ती विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आपले प्राण पणाला लावत असल्याबद्दल त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे. अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले की, नीट परीक्षेच्या पेपरफुटीमुळे ज्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे प्रत्येक संवेदनशील नागरिकाचे कर्तव्य आहे. याच भूमिकेतून त्यांनी वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा : बीडमध्ये लग्नाचं आमिष दाखवून तरुणाची अडीच लाखांची फसवणूक? दुसऱ्या मुलासोबत
अमित ठाकरे यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा :
मात्र, हा जाहीर पाठिंबा देत असतानाच अमित ठाकरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अमित ठाकरे यांच्या मते, हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि एका अत्यंत गंभीर विषयावर सुरू आहे, परंतु आंदोलनस्थळी ज्या पद्धतीचे वातावरण तयार केले जात आहे, ते या विषयाचे गांभीर्य नष्ट करणारे आहे. त्यांनी थेट शब्दांत टीका करताना म्हटले की, जंतर-मंतरवर सध्या ज्या प्रकारे सोशल मीडियावरील ‘रील्स’ बनवणे, केवळ फोटो काढण्यासाठी पोझ देणे आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी विविध प्रकारचे “नाटक” करणे सुरू आहे, ते अत्यंत निंदनीय आहे. अशा रील संस्कृतीमुळे लाखो विद्यार्थ्यांचा हा संवेदनशील लढा केवळ एका सोशल मीडिया इव्हेंट पुरता मर्यादित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. अमित ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांचा पाठिंबा हा केवळ आणि केवळ सोनम वांगचुक आणि देशातील निष्पाप विद्यार्थ्यांना आहे, परंतु अभिजीत दिपके आणि त्यांच्या संघटनेच्या अशा फालतू कार्यपद्धतीला त्यांचा तीव्र विरोध आहे. आंदोलन हे गांभीर्याने आणि ध्येयाने केले पाहिजे, त्याला मनोरंजनाचे साधन बनवता कामा नये, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली आहे.
Sonam Wangchuk : गेल्या वीस दिवसांत सोनम वांगचुक यांचे वजन तब्बल ९ किलोने घटले आहे.
या आंदोलनाचे गांभीर्य केवळ राजकीय वादापुरते मर्यादित नसून, सोनम वांगचुक यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा २० वा दिवस असून एवढ्या प्रदीर्घ उपवासामुळे त्यांच्या शरीरावर अत्यंत विपरीत परिणाम झाले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, गेल्या वीस दिवसांत सोनम वांगचुक यांचे वजन तब्बल ९ किलोने घटले आहे. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमालीची खालावली असून, शरीरातील स्नायूंचे विघटन सुरू झाले आहे. डॉक्टरांनी अत्यंत गंभीर इशारा दिला आहे की, जर हे उपोषण असेच सुरू राहिले, तर त्यांच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होण्याची भीती आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने देखील या प्रकरणाची दखल घेत केंद्र आणि दिल्ली सरकारला वांगचुक यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचे आणि त्यांच्या वैद्यकीय स्थितीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही केंद्र सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने आंदोलकांमध्ये आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Amit Thackrey Sonam Wangchuk : सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर व्यापक राजकीय समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सरकार सोनम वांगचुक यांच्या जीवाशी खेळत असून त्यांचा बळी घेत आहे’, असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर केला आहे . नीट परीक्षेतील या ऐतिहासिक घोटाळ्यानंतर देशातील २० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेचे इतके मोठे वाभाडे निघाले असताना आणि निष्पाप विद्यार्थ्यांचे बळी जात असताना शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ पद सोडायला हवे होते, असे अमित ठाकरे यांनी देखील आवर्जून सांगितले आहे.
२० जुलै रोजी दिल्लीत संसदेवर मोर्चा :
दुसरीकडे, महाराष्ट्रातीलच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या आंदोलनाला पक्षाचा अधिकृत आणि पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, हा विषय कोणत्याही एका पक्षाचा किंवा राजकारणाचा नसून हा देशातील तरुण पिढीच्या आणि संपूर्ण देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. जर देशातील सर्वात महत्त्वाची मानली जाणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षाच सुरक्षित नसेल आणि तिचे पेपर फुटत असतील, तर देशातील शिक्षण व्यवस्थेवर जनतेचा विश्वास कसा राहणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी स्वतः दिल्ली गाठून जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एवढेच नव्हे तर, ठाकरे गटाने या आंदोलनाच्या समर्थनार्थ १९ जुलै रोजी मुंबईतील दादर येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्याची घोषणा केली आहे, तर २० जुलै रोजी दिल्लीत संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चातही त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला या मुद्द्यावरून धारेवर धरले आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल आणि खासदार शशी थरुर यांनी सोनम वांगचुक [ Sonam Wangchuk ] यांच्या आरोग्याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. शशी थरुर यांनी वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे आणि केंद्र सरकारने तातडीने आंदोलकांशी चर्चा करून या समस्येवर मार्ग काढावा, अशी मागणी केली आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही जंतर-मंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली. केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका करताना म्हटले की, धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्री पदावरून तात्काळ हटवले पाहिजे आणि त्यांच्या जागी सोनम वांगचुक यांच्यासारख्या प्रामाणिक आणि सुशिक्षित व्यक्तीला देशाचे शिक्षण मंत्री बनवले पाहिजे, जेणेकरून देशातील शिक्षण व्यवस्था सुधारेल. याशिवाय समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत संसदेच्या आगामी अधिवेशनात हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडण्याचे संकेत दिले आहेत.
[ Amit Thackrey Sonam Wangchuk ]सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची चिंता :
आता अमित ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे. एका बाजूला सोनम वांगचुक यांच्यासारखा देशभक्त आणि समाजसेवक विद्यार्थ्यांसाठी आपले प्राण पणाला लावत आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकार आपली राजकीय पोळी भाजण्यात व्यस्त आहे, विरोधी पक्षांची एकजूट, विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि सोनम वांगचुक यांची खालावलेली प्रकृती यामुळे केंद्र सरकारवर या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याचा प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. आता २० जुलै रोजी होणाऱ्या संसद मार्चकडे आणि त्यावर केंद्र सरकार काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.









