Beed Marriage Fraud : बीड जिल्हा कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो…बीड जिल्ह्याची चर्चा विकास कामामुळे किंवा काहीतरी चांगले काम केले म्हणून होत नाही…तर गुन्हेगारींच्या घटनांमुळे बीड जिल्ह्याची चर्चा होत असते..पहिले बीड जिल्हा संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे चर्चेत होता…आता विलास घुले हत्या प्रकरण आणि त्यानंतर ज्ञानेश्वर वाकडे हत्याकांड, यशोदा राठोड हत्यांकाड अशा अनेक घटना आहेत, ज्या गंभीर घटनांमुळे बीड चर्चेत आहे…किरकोळ कारणावरून बीडमध्ये थेट हत्याच होते..आता बीडमध्ये तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून लुटण्यात देखील येत आहे…धारूर तालुक्यातील एका तरुणाने पोलिसांत तक्रार दिलीये की तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केलीये..तरुणीने माझा दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे म्हणत लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप तरुणाने केलाय..नेमकं बीडमध्ये चाललंय काय? तरुणाची कशी फसवणूक करण्यात आलीये?
हेही वाचा : भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन आजपासून सुरु! कसा असेल मार्ग? किती
[ Beed Marriage Fraud ] धारूरमध्ये साखरपुड्यानंतर घर बांधण्याच्या नावाखाली अडीच लाख रुपये घेतल्याचा आरोप :
धारूर तालुक्यातील गोपाळपूरमधील श्रीनाथचा पूजा नावाच्या तरुणीसोबत विवाह ठरला होता..थाटामाटात त्याचा साखरपडा देखील झाला…त्यामुळे तरुण आनंदीत होता..मात्र साखरपुडा झाल्यानंतर श्रीनाथच्या होणाऱ्या पत्नीने आणि त्याच्या सासरच्यांनी नवीन घर बांधायचे असल्याचे सांगत त्याच्याकडे पैसे मागितले… मुलगी आपल्याच घरी येणार या विश्वासापोटी श्रीनाथने त्यांना मदत करण्याचे ठरवले. याचाच गैरफायदा घेत दोन्ही मायलेकींनी घर बांधण्याच्या बहाण्याने वेळोवेळी ऑनलाईन आणि रोख स्वरूपात श्रीनाथकडून एकूण 2 लाख 50 हजार रुपये उकळले…तरुण जेव्हा लग्नाबाबत बोलायचा तेव्हा आपण काही दिवसांनी लग्न लावून देऊ, असं तरुणाला म्हटलं जायचं..तरूणाला वाटलं की काही दिवसांनी तरुणीसोबत आपलं लग्न होऊन जाईल..त्यामुळे तरुण वेळोवेळी तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना पैसे देत राहिला…तरुणाची परिस्थिती हालाखिची असल्याची माहिती आहे..तरुण हा मजुरी करून आपलं उदरनिर्वाह चालवतो..
साखरपुड्यानंतर पैशांची मागणी कशी सुरू झाली?
पैसे उकळल्यानंतर माय-लेकीच्या मनात वेगळाच विचार यायला सुरूवात झाली..दोघांच्या वर्तनात बदल झाला. तरुणीने दुसऱ्या एका मुलासोबत आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगत श्रीनाथसोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला [ Beed Marriage Fraud ] … आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणाने धारूर पोलीस ठाण्यात धाव घेतली… त्याने पैशांच्या देवाणघेवाणीचे काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांना दिले आहे.. दोन्ही मायलेकींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी आणि आपले अडीच लाख रुपये परत मिळवून द्यावेत, अशी मागणी तक्रारीत केली आहे.
Beed Marriage Fraud :
याप्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे..मात्र आता या तरुणाला न्याय मिळार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…कारण तरुणाचा साखरपुडा 2023 मध्ये झाला होता..तेव्हापासून आतापर्यंत तरुणाने तरुणीला पैसे दिल्याची माहिती आहे…त्याने जरी पोलिसांकडे पैसे दिल्याचे पुरावे दिले असले..तरी आता तरुणी पोलिसांत काय जबाब देणार..हे महत्त्वाचं ठरणार आहे..या प्रकरणात आता तरुणी देखील तरुणावर गंभीर आरोप करण्याची शक्यता आहे…









