Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मोठी बातमी! स्विगीच्या शेअरमध्ये आज 7% घसरण; गुंतवणूकदारांच्या चिंतेमागचं नेमकं कारण काय?
बिजनेस

मोठी बातमी! स्विगीच्या शेअरमध्ये आज 7% घसरण; गुंतवणूकदारांच्या चिंतेमागचं नेमकं कारण काय?

Swiggy Share Price
Swiggy Share Price: ओनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्वीगी लिमिटेडच्या शेअरमध्ये शुक्रवार मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यवहारादरम्यान कंपनीचा शेअर सुमारे ७ टक्क्यांनी खाली आला. कंपनीच्या संचालक मंडळाने परदेशी भागभांडवलाच्या मर्यादेबाबत महत्वाचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर बाजारात नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्याचे दिसून आले.

शुक्रवारी स्वीगी लिमिटेडच्या शेअरमध्ये सुमारे ७ टक्क्यांची घसरण झाली. कंपनीच्या संचालक मंडळाने परदेशी गुंतवणुकीवरील मर्यादा १०० टक्क्यांवरून ४९.५० % पर्यंत आणण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली. या निर्णयानंतर शेअर विक्रीचा दबाव वाढल्याचे दिसून आले.

कंपनीने गुरुवारी सायंकाळी हा निर्णय जाहीर केला. मात्र या प्रस्तावाला अंतिम मंजुरी १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) भागधारकांकडून मिळणे आवश्यक आहे.

हेही वाचा: ‘रामायण’चा ट्रेलर आज नाही होणार रिलीज; जाणून घ्या पुढे ढकलण्यामागचं नेमकं कारण

कंपनीने हा निर्णय का घेतला?

स्विगीने भारतीय मालकी असलेल्या आणि नियंत्रित कंपनीचा (Indian Owned and Controlled Company – IOCC) दर्जा मिळवण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न केले होते. यासाठी कंपनीला आपल्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशन (AoA) मध्ये बदल करणे आवश्यक होते.

मात्र मे महिन्यात आवश्यक भागधारकांची मंजुरी न मिळाल्यामुळे हा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नव्हता. आता संचालक मंडळाने पुन्हा आवश्यक बदलांना मंजुरी दिली आहे.

52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या जवळ शेअर

शुक्रवारी बीएसईवर स्विगीचा शेअर 260 रुपयांवर (Swiggy Share Price) उघडला. मात्र दिवसभरात तो 7 टक्क्यांहून अधिक घसरत 242.60 रुपये या दिवसातील नीचांकी पातळीवर पोहोचला.

सध्या कंपनीचा 52 आठवड्यांतील नीचांकी स्तर 235.85 रुपये, तर उच्चांकी स्तर 473 रुपये आहे. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) सुमारे 68,386 कोटी रुपये आहे.

गेल्या वर्षभरात मोठी घसरण

गेल्या तीन महिन्यांत स्विगीच्या शेअरमध्ये सुमारे 13 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर मागील एका वर्षात कंपनीच्या शेअरची किंमत जवळपास 40 टक्क्यांनी घसरली आहे. त्याच कालावधीत सेन्सेक्समध्ये सुमारे 8 टक्क्यांची वाढ झाली असून, स्विगीची कामगिरी बाजारापेक्षा कमकुवत राहिली आहे.

संचालक मंडळाचे इतर महत्त्वाचे निर्णय

परदेशी गुंतवणुकीवरील मर्यादा निश्चित करण्याबरोबरच संचालक मंडळाने FEMA (Foreign Exchange Management Act) नियमांनुसार कंपनीच्या AoA मध्ये बदल करण्यासही मंजुरी दिली आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts