• Home
  • देश
  • जंतर-मंतरवरून हटवण्याची भीती; विद्यार्थी रात्रभर जागे, अभिजित दिपकेंच्या अन्नत्याग उपोषणाचा दुसरा दिवस !
Top News

जंतर-मंतरवरून हटवण्याची भीती; विद्यार्थी रात्रभर जागे, अभिजित दिपकेंच्या अन्नत्याग उपोषणाचा दुसरा दिवस !

Jantar Mantar protest
Jantar Mantar Protest: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस नवे वळण मिळत आहे. अभिजित दिपके यांच्या अन्नत्याग उपोषणाचा आज (१९ जुलै) दुसरा दिवस असून, दुसरीकडे रुग्णालयात दाखल असलेले सोनम वांगचुक यांचेही उपोषण सुरूच आहे. त्यांच्या उपोषणाचा आज २२ वा दिवस असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून आंदोलकांना जंतर-मंतरवरून हटवले जाईल, या भीतीने मोठ्या संख्येने विद्यार्थी रात्रभर आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते.

अभिजित दिपके यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची धुरा पुढे नेत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला विविध राज्यांतील विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असून, आंदोलनस्थळी दिवसभर घोषणाबाजी आणि शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे.

हेही वाचा: जुलैचा तिसरा आठवडा! ‘या’ राशींसाठी ठरू शकतो गोल्डन टाईम; करिअर, पैसा आणि प्रेमात यशाची शक्यता, वाचा तुमचं राशीभविष्य

दुसरीकडे, सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आंदोलनस्थळावरून ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथूनच त्यांनी उपोषण सुरू ठेवले आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता कायम असून, त्यांच्या समर्थकांमध्येही मोठी अस्वस्थता आहे.

दरम्यान, पोलिसांकडून आज जंतर-मंतरवरील आंदोलन हटवण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने आंदोलक विद्यार्थ्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली. आज सकाळीही मोठ्या संख्येने विद्यार्थी जंतर-मंतरवर उपस्थित असून, आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

उद्या संसदेचे अधिवेशन सुरू होणार असल्याने आंदोलक संसदेवर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनाला पुढील काही दिवसांत आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts