CJP Elon Musk : राजकारणात जेव्हा एखादे आंदोलन सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरते, तेव्हा त्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय कट किंवा परदेशी शक्तींचा हात असल्याचे म्हटले जाणे नवीन नाही. पण भारताच्या राजधानीतील CJP आंदोलनाचा थेट संबंध जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीशी, म्हणजेच इलॉन मस्क यांच्याशी जोडला गेलाय, भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी CJP वर आरोप केला आहे की, हे आंदोलन इलॉन मस्क यांच्या इशाऱ्यावर चालवले जात आहे. दुसरीकडे, CJP चे संस्थापक अभिजित दिपके हे देशातील तरुण आणि निवडणूक सुधारणांच्या मुद्द्यांवर ठाम आहेत. खरंच या संपूर्ण वादात इलॉन मस्क यांचा काही हात असू शकतो का? की यामागे आंदोलन दडपण्याचा आणि देशविरोधी ठरवण्याचा सरकारचा डाव आहे, पाहूयात….
CJP आंदोलनामागे एलॉन मस्क? ( CJP Elon Musk )
CJP च्या वाढत्या प्रभावामुळे सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका कार्यक्रमात बोलताना बृजभूषण शरण सिंह यांनी थेट दावा केला की, ‘हे आंदोलन देशाविरुद्धचा मोठा कट असून ते इलॉन मस्कच्या इशाऱ्यावर चालवले जात आहे. केवळ बृजभूषण सिंहच नव्हे, तर अमेरिकन गायिका मॅरी मिलबेन आणि काही उजव्या विचारसरणीच्या काही लोकांनी सुद्धा CJP ला अमेरिकेतून फंडिंग मिळत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या या संशयामागे प्रामुख्याने दोन मोठे कारनं दिले जात आहेत पहिले कारण कि अभिजित दिपके हे मूळचे महाराष्ट्रातील असले, तरी ते आंदोलन करण्याच्या आंधी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते, त्यामुळे आंदोलनाचे नियंत्रण परदेशातून होत असल्याचा संशय घेतला गेला. दुसरे कारण म्हणजे इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट सेवा परवान्यावरून मस्क आणि भारत सरकार यांच्यात गेल्या काही दिवसांत अप्रत्यक्ष वाद आणि ताणतणाव निर्माण झाला आहे.
या वादाची पाळेमुळे सोशल मीडियावरील एका उपरोधिक पोस्टमध्ये दडलेली आहेत. काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर एक मीम व्हायरल झाले होते, ज्यात विनोदाने लिहिले होते की, स्टारलिंकला भारतात परवानगी न मिळाल्यामुळे इलॉन मस्क जंतरमंतरवरील कॉकरोच आंदोलनात सामील होणार आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, बृजभूषण सिंह किंवा त्यांच्या सल्लागारांनी या सोशल मीडियावरील अफवेलाच सत्य मानून एवढा मोठा आरोप केला असण्याची शक्यता ९९% आहे. इलॉन मस्क हे व्यावसायिक आहेत. जेव्हा त्यांना एखाद्या देशात व्यावसायिक अडथळे येतात, तेव्हा ते लॉबिंग करतात, तिथल्या सरकारशी चर्चा करतात आणि सोशल मीडियावरून आपली नाराजी उघडपणे व्यक्त करतात जसे त्यांनी भारताच्या दूरसंचार धोरणांवर केले आहे. परंतु, भारतातील एका स्थानिक विद्यार्थी आंदोलनाला किंवा निवडणूक सुधारणांच्या आंदोलनाला मस्क छुप्या पद्धतीने पैसे पुरवतील किंवा नियंत्रित करतील, या आंतरराष्ट्रीय सिद्धांताला कोणताही ठोस कायदेशीर आधार नाही.
हेही वाचा : IDBI बँक विक्रीचा निर्णय! सरकारला पैशांची गरज का? तुमच्या खात्याचं काय होणार?
एलॉन मस्क यांचा आंदोलनाशी संबंध असल्याचा दावा
CJP चे आंदोलन हे निवडणूक प्रक्रियावर आधारित आहे. या मुद्द्यांचा आणि अमेरिकन कॉर्पोरेट कंपन्यांचा किंवा इलॉन मस्कच्या स्टारलिंकचा दुरान्वयानेही संबंध नाही. त्यामुळे ‘मस्क यांच्या इशाऱ्यावर आंदोलन चालते आहे’ हा दावा तार्किकदृष्ट्या टिकत नाही, मात्र जर देशात सत्तापालट झाला आणि विरोधी पक्षांचे सरकार आले, तर त्यांच्या धोरणांनुसार ते एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी परदेशी कंपन्यांना किंवा नवीन स्पर्धकांना वाव देऊ शकतात. तथापि, राष्ट्रीय सुरक्षा हा मुद्दा कोणत्याही सरकारच्या काळात बदलत नाही. सध्याच्या सरकारनेही स्टारलिंकला डेटा सुरक्षा आणि नियमांचे पालन करण्याच्या अटी घातल्या आहेत. त्यामुळे सरकार बदलले तरी मस्क यांना भारताच्या सुरक्षा नियमांचे पालन करावेच लागेल.
राजकारणात असोसिएशन बाय गिल्ट नावाची एक रणनीती असते. राहुल गांधींनी मस्क यांच्या पोस्टला उत्तर दिले, राहुल गांधींनी कॉकरोच आंदोलनालाही पाठिंबा दिला, आणि कॉकरोच आंदोलनाचे प्रमुख अभिजित दिपके हे अमेरिकेत शिकतात. सत्ताधाऱ्यांनी या तीन वेगवेगळ्या गोष्टींची साखळी तयार केली आणि असा युक्तिवाद मांडला की अमेरिका + मस्क + राहुल गांधी + कॉकरोच आंदोलन = सरकार पाडण्याचा कट. अशी हि रणनीती असल्याचं सत्ताधारी यांच्यांकडून सांगण्यात येतंय पण ही रणनीती आंदोलनाची धार भरकटवण्यासाठी आणि त्याला अँटी-नॅशनल ठरवण्यासाठी सुद्धा वापरली जाऊ शकते….
CJP आंदोलनामागे परदेशी फंडिंग आहे का? ( Cockroach Janta Party )
“दुसरीकडे, अभिजित दिपके ( Abhijeet Dipke ) यांनी या परदेशी फंडिंगच्या आरोपांना साफ फेटाळले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आम्हाला कोणत्याही परदेशी शक्तीची गरज नाही, आम्ही आमच्या देशातील अंतर्गत मुद्द्यांवर लढत आहोत आणि हा देशातील सामान्य तरुणांचा आवाज आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, दिल्ली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देऊन CJP च्या नेत्यांना ताब्यात घेतले असले, तरी दिल्ली हायकोर्टाने त्यांच्या लहरा दो तिरंगा मार्चला पूर्णपणे बंदी घालण्यास नकार दिला आणि पोलिसांना कायदा सुव्यवस्थेनुसार आंदोलन हाताळण्याचे निर्देश दिले. जर या आंदोलनामागे खरोखरच आंतरराष्ट्रीय कट किंवा इलॉन मस्क यांचे फंडिंग असते, तर केंद्रीय तपास यंत्रणांनी आतापर्यंत फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट अंतर्गत गुन्हे नोंदवून मोठे पुरावे सादर केले असते. पण अजूनपर्यंत कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही.
“या संपूर्ण प्रकरणाचा निष्कर्ष काय निघतो? तर राजकारणात जेव्हा एखादी नवीन शक्ती किंवा आंदोलन वेगाने उभे राहते, तेव्हा त्याला विदेशी कट किंवा टूलकिट’ठरवून त्याची धार कमी करण्याचा प्रयत्न प्रत्येक सत्ताधारी करतो. बृजभूषण सिंह यांनी इलॉन मस्क यांचे नाव घेणे, हा सोशल मीडियावरील एका विनोदाचा राजकीय गैरवापर किंवा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रकार वाटतो. इलॉन मस्क आणि भारत सरकार यांच्यातील व्यावसायिक मतभेद हे पूर्णपणे वेगळे आहेत, आणि दिल्लीच्या रस्त्यांवर उतरलेल्या तरुणांचा रोष पूर्णपणे देशांतर्गत मुद्द्यांवर आधारित आहे.









