Kurkure and Chips Side Effects: सायंकाळी भूक लागली की, अनेकजण चटकन कुरकुरे किंवा चिप्स खातात. मात्र, ही रोजची सवय आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकते. चला तर जाणून घेऊयात अधिक माहिती.
सायंकाळी ४ वाजता भूक लागली की लगेच कुरकुरे किंवा चिप्स खाण्याची सवय (Kurkure and Chips Eat every day ) अनेकांना असते. टीव्ही पाहताना, ऑफिसमध्ये काम करताना किंवा पटकन काहीतरी खावंसं वाटलं की हातात कुरकुरे किंवा चिप्सचं पाकीट (Junk Food Risks) येतं. चवदार, टेस्टी आणि सहज उपलब्ध असल्यामुळे हे स्नॅक्स (packaged snacks) खूप लोकप्रिय झाले आहेत. मात्र, रोज यांचे सेवन केल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ( Healthy Snacks) ठरू शकते, हे अनेकांच्या लक्षातही येत नाही.
हेही वाचा: शिंदे गटाला मोठा धक्का! सोलापुरात नगराध्यक्षांसह अनेक पदाधिकारी भाजपमध्ये जाणार?
कुरकुरे आणि चिप्स इतके आकर्षक का वाटतात?
कुरकुरे आणि चिप्समध्ये (Kurkure and chips) मीठ तेल आणि विविध फ्लेवर्सचे मिश्रण असते. त्यामुळे त्यांची चव अधिक आकर्षक वाटते. कुरकुरे पोट आणि मसालेदार चवीमुळे किती प्रमाणात चिप्स खाल्ले जात आहेत, याचे भान राहत नाही त्यांचे अतिसेवन होण्याची शक्यता वाढते.
रोज कुरकुरे आणि चिप्स खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम
1. रक्तदाब वाढण्याचा धोका (high blood pressure)
पॅकेटबंद कुरकुरे/ चिप्समध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढून रक्तदाब वाढू शकतो. दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
2. वजन वाढण्याची शक्यता
कुरकुरे/ चिप्समध्ये कॅलरी जास्त आणि पोषणमूल्य कमी असते. त्यामुळे वारंवार सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते, विशेषतः शारीरिक हालचाल कमी करणाऱ्यांमध्ये हा धोका अधिक असतो.
3. वाईट (LDL) कोलेस्टेरॉल वाढणे
काही कुरकुरे/ चिप्स तयार करताना कमी दर्जाचे किंवा वारंवार वापरलेले तेल वापरले जाते. त्यामुळे शरीरातील LDL (वाईट कोलेस्टेरॉल) वाढून हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
4. पचनाच्या समस्या
जास्त प्रमाणात चिप्स आणि कुरकुरे खाल्ल्यास गॅस, अॅसिडिटी, पोटफुगी अशा समस्या उद्भवू शकतात. फायबर कमी आणि प्रक्रिया केलेले घटक जास्त असल्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो.
5. मुलांच्या आहारा वर परिणाम
लहान मुलांना कुरकुरेआणि चिप्सची सवय लागल्यास ते पौष्टिक घरगुती अन्न, फळे आणि भाज्या कमी प्रमाणात खाऊ लागतात. त्यामुळे त्यांच्या वाढीवर आणि एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा: Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC ची नोटीस; काय आहे प्रकरण?
6. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे
अशा प्रक्रिया केलेल्या स्नॅक्समध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी असतात. त्यामुळे नियमित सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होण्याची शक्यता असते.
कुरकुरे आणि चिप्सऐवजी काय खाऊ शकता?
भूक लागल्यावर चिप्सऐवजी आरोग्यदायी पर्याय निवडणे अधिक फायदेशीर ठरते.
भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि बिया
ताजी फळे
कमी मीठाचे घरगुती पॉपकॉर्न
भाजलेले मखाणे
काकडी, गाजर यांसारख्या भाज्यांचे तुकडे आणि हेल्दी डिप्स
हे पर्याय चवदार तर असतातच, शिवाय शरीराला आवश्यक पोषक घटकही पुरवतात आणि दीर्घकालीन आरोग्यासाठी अधिक लाभदायक ठरतात.









