Non Veg Heart Attack : नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मांसाहार केला म्हणून थेट हार्ट अटॅक होतो, असं म्हणता येत नाही. मात्र मांसाचा प्रकार, त्यातील चरबी, प्रमाण आणि ते कशा पद्धतीने शिजवलं जातं, याचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहाराची भूमिका महत्त्वाची आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या 2026 च्या मार्गदर्शनानुसार आहारामध्ये भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, कडधान्ये, नट्स, मासे आणि कमी चरबीयुक्त प्रथिनांचे स्रोत यांचा समावेश करण्यावर भर दिला जातो. त्याचबरोबर लाल आणि processed meat तसेच saturated fatचे सेवन मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
लाल मांसाबाबत काय काळजी घ्यावी? ( Non Veg Heart Attack )
बीफ, पोर्क आणि लॅम्बसारख्या red meatमध्ये skinless chicken किंवा fishच्या तुलनेत saturated fatचे प्रमाण जास्त असू शकते. Saturated fatमुळे रक्तातील LDL म्हणजेच ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल वाढू शकते आणि हृदयविकाराचा धोका वाढण्यास हातभार लागू शकतो.
त्यामुळे नॉनव्हेज पूर्णपणे बंद करण्यापेक्षा काय खातो, किती खातो आणि किती वेळा खातो, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं.
Processed meatपासून सावध राहण्याचा सल्ला
सॉसेज, बेकन, हॅम आणि काही प्रकारचे processed meat यामध्ये मीठ आणि चरबी जास्त असू शकते. जास्त sodiumचे सेवन उच्च रक्तदाब आणि cardiovascular diseaseच्या जोखमीशी संबंधित आहे.
मांस कसं शिजवलं जातं हेही महत्त्वाचं
मांस अतिशय उच्च तापमानावर grill, deep fry किंवा barbecue केल्यास काही हानिकारक संयुगे तयार होऊ शकतात. WHOच्या माहितीनुसार मांस शिजवण्याची पद्धतही आरोग्याच्या परिणामांमध्ये भूमिका बजावू शकते.
मग नॉनव्हेज खाणं पूर्णपणे चुकीचं आहे का?
नाही. “नॉनव्हेज खाल्लं की हार्ट अटॅक होतो” असा सरळ निष्कर्ष काढणं योग्य नाही. आहाराचा एकूण पॅटर्न, वजन, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, रक्तातील साखर, शारीरिक हालचाल आणि इतर जोखीम घटक यांचाही हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
म्हणून मांसाहार करणाऱ्यांनी lean आणि unprocessed meatचे पर्याय निवडणे, portion control ठेवणे आणि processed meat व अतिरिक्त saturated fat कमी ठेवणे याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.









