Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • धुरंधरला धोबीपछाड! अवघ्या ९६ तासात धनुषचा ‘कारा’ नेटफ्लिक्सवर टाॅपला…
Top News

धुरंधरला धोबीपछाड! अवघ्या ९६ तासात धनुषचा ‘कारा’ नेटफ्लिक्सवर टाॅपला…

Dhanush Kara Netflix Number 1

Dhanush Kara Netflix Number 1 : बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेहमीच एकापेक्षा एक तगड्या चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळतेय. सध्या ओटीटी विश्वात अशीच एक मोठी उलथापालथ झालीय. बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाला नेटफ्लिक्सवर एका दाक्षिणात्य चित्रपटाने जोरदार धोबीपछाड दिली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषची मुख्य भूमिका असलेल्या ‘कारा’ या तमिळ ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाने प्रदर्शित होताच अवघ्या चार दिवसांत नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंगच्या यादीत थेट पहिले स्थान पटकावले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या धुरंधरला मागे टाकत काराने आपली घोडदौड सुरू केली आहे. 2तास 38मिनिटांच्या या चित्रपटाने सोशल मीडिया आणि ओटीटीवर तुफान चर्चा घडवून आणली. त्यामुळे या चित्रपत्राची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आदित्य धर दिग्दर्शित 2025मधील बहुचर्चित चित्रपट धुरंधर नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या चित्रपटाने आधी थिएटरमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. थिएटरनंतर जेव्हा हा चित्रपट ओटीटीवर आला, तेव्हाही त्याला प्रेक्षकांकडून डिजिटल प्लॅटफॉर्मवर दमदार प्रतिसाद मिळाला. रणवीर सिंहच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट बऱ्याच काळापासून नेटफ्लिक्सवर नंबर वन ट्रेंडिंग चित्रपट म्हणून कायम होता.

कारा या चित्रपटाने अवघ्या 96 तासांत संपूर्ण चित्र पालटून टाकले

मात्र, 28मे 2026रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झालेल्या कारा या चित्रपटाने अवघ्या 96 तासांत म्हणजे चार दिवसांत संपूर्ण चित्र पालटून टाकले. काराच्या सुसाट वेगामुळे रणवीर सिंहचा धुरंधर आता थेट नवव्या स्थानावर पोहोचला आहे, तर धुरंधर रॉ अँड अनदेखा हा भाग तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. कारा हा केवळ ॲक्शन चित्रपट नसून, त्याची कथा एका हुशार आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या चोरीवर आधारित आहे. अभिनेता धनुष मुख्य भूमिकेत असून, त्याच्या पात्राची गुंफण अतिशय रंजक पद्धतीने करण्यात आली आहे.

कारा चित्रपटाला 10 पैकी 7.3 अशी उत्कृष्ट रेटिंग मिळाली

चित्रपटाची कथा, वेगवान स्क्रीनप्ले, धारदार संवाद आणि अनपेक्षित ट्विस्ट-टर्न्स यांचे उत्तम मिश्रण प्रेक्षकांना पाहायला मिळते. या चित्रपटात धनुषसोबतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ममिता बैजू, ज्येष्ठ अभिनेते के. एस. रविकुमार आणि सूरज वेंजारामुडू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सर्वच कलाकारांनी आपापल्या पात्रांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाची लोकप्रियता केवळ व्ह्यूजपुरती मर्यादित नसून, समीक्षक आणि प्रेक्षकांनीही याला पसंती दिलीय. जागतिक स्तरावर चित्रपटांचे मूल्यमापन करणाऱ्या संकेतस्थळावर कारा चित्रपटाला 10 पैकी 7.3 अशी उत्कृष्ट रेटिंग मिळाली आहे. या रेटिंगवरूनच चित्रपटाच्या दर्जाचा अंदाज लावता येतो.

धनुष हा केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर संपूर्ण भारतात त्याच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जातो. यापूर्वीही त्याने अनेक सुपरहिट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिले आहेत. आता कारा हा त्याच्या सिने-करिअरमधील आणखी एक मैलाचा दगड आणि सलग हिट ठरणारा चित्रपट सिद्ध होत आहे. जर तुम्हाला रहस्य, थरार, उत्कृष्ट ॲक्शन आणि बुद्धीला चालना देणाऱ्या स्मार्ट चोरीच्या कथा पाहायला आवडत असतील, तर कारा हा चित्रपट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts