• Home
  • राजकारण
  • भाजपचा दक्षिणेतल्या राजकारणातला प्रमुख चेहरा, पक्षाला सोडचिठ्ठी देणार?
Top News

भाजपचा दक्षिणेतल्या राजकारणातला प्रमुख चेहरा, पक्षाला सोडचिठ्ठी देणार?

BJP South India setback

BJP South India setback : सध्या देशभरात भाजप पक्षात जोरदार इनकमिंग सुरु आहे. मात्र, दक्षिणेतून भाजप पक्षासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. उत्तरेत भाजप पक्षाची आधीच ओळख आहे. मात्र, भाजपने आता स्वतःला देशव्यापी बनवलं आहे. उत्तरेतल्या राज्यांपुरता मर्यादीत न राहता भाजपची दक्षिण, ईशान्येकडेही जोरदार वाटचाल सुरु आहे. प्रत्येक राज्यातील प्रभावी नेतृत्व आणि संघटनात्मक रचनेच्या बळावर भाजपने आतापर्यंत अशक्य वाटणारी राज्य जिंकून दाखवली आहेत. पश्चिम बंगाल हे त्यातील ताजे उदाहरण आहे.

दरम्यान, भाजपमध्ये इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांचाओघ वाढलेला असताना आता भाजपमधला एक बडा नेता पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे. भाजपचा दक्षिणेतल्या राजकारणातला प्रमुख चेहरा असलेला नेता पक्षातून बाहेर पडणार असल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे युवा नेते अन्नामलाई भाजपपासून वेगळे होऊन स्वतंत्र पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. अन्नामलाई हे तामिळनाडूच्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे भाजपकडे दक्षिणेत मोठा चेहरा मिळणं कठीण जाणार आहे.

फोटोंवर अन्नामलाईचे फोटो आणि संदेश

तामिळनाडूमध्ये मागच्याच महिन्यात सरकार स्थापन झालं. अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या थलपती विजय यांच्या हातात तामिळ जनतेने राज्याची सूत्रं दिली. आता तामिळ राजकारणात लवकरच एका नव्या पक्षाचा उदय होऊ शकतो. तामिळनाडूच्या कोयम्बूटर शहरात ठिकठिकाणी अन्नामलईचे पोस्टर लागले आहेत. त्या फोटोंवर अन्नामलाईचे फोटो आणि संदेश आहे. अन्नामलाई पुढच्या दोन ते तीन दिवसात भाजपमध्ये रहायचं की नाही? या बद्दल निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे ही भाजपमधून बाहेर पडण्याची पूर्वपायरी असल्याचे सांगितले जात आहे.

अन्नामलाई हे माजी आयपीएस अधिकारी

अन्नामलाई हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी नोकरी सोडून तामिळनाडू सारख्या राज्यात भाजपची निवड केली, जिथे मूळातच भाजपचा जनाधार खूप कमी आहे. आयपीएस असलेल्या अन्नामलाई यांची कर्नाटक पोलीस दलता सिंघमची प्रतिमा होती. राजकारणात येऊन काम करण्याची त्यांची इच्छा होती. म्हणून अन्नमलाई यांनी २०१९ मध्ये पोलीस दलातील पदाचा राजीनामा दिला.

मी रजनीकांतच्या घोषणेची वाट बघतोय

एका फेसबुक लाईव्ह सेशन दरम्यान अन्नामलाई यांनी मी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेशाचा विचार करतोय असं म्हटलेलं. तामिळनाडूची पुढची विधानसभा निवडणूक लढवू शकतो. कुठल्या पक्षात जायचं हे अन्नामलाई यांनी सुरुवातीला ठरवलं नव्हतं. एकवेळ ते बोललेले की, मी रजनीकांतच्या घोषणेची वाट बघतोय. पण रंजनीकांत यांनी काही निर्णय घेतला नाही. त्यानंतर तीन महिन्यांनी अन्नामलाई भाजपमध्ये सहभागी झाले. मात्र, आता भाजपमधून बाहेर पडून स्वतंत्र्य पक्ष स्थापनेचा त्यांचा मनसूबा दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts