• Home
  • मनोरंजन
  • बॉक्स ऑफिसवर ‘स्पायडर- मॅन: ब्रँड न्यू डे’ चा जबरदस्त धमाका; पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई
मनोरंजन

बॉक्स ऑफिसवर ‘स्पायडर- मॅन: ब्रँड न्यू डे’ चा जबरदस्त धमाका; पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई

Spider-Man: Brand New Day Box Office

Spider-Man: Brand New Day Box Office: मार्व्हलच्या बहुप्रतीक्षित ‘स्पायडर- मॅन: ब्रँड न्यू डे’ या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर शानदार सुरुवात करत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे हा चित्रपट भारतातील सर्वाधिक ओपनिंग करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

३० जुलै रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या सुपरहिरो चित्रपटासाठी चाहत्यांसाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. रिलीजपूर्वीच मोठ्या प्रमाणावर अॅडव्हान्स बुकिंग झाली होती. प्रदर्शनाच्या दिवशी अनेक शहरांमध्ये जवळपास सर्वच शो भरल्याचे चित्रपट दिसून आले. त्यामुळे चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई दमदार सुरुवात केली.

हेही वाचा: भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; दोन जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

पहिल्या दिवसाची कमाई

बॉक्स ऑफिस ट्रॅकर Sacnilk च्या प्राथमिक अंदाजानुसार, ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ ने भारतात पहिल्याच दिवशी 60.60 कोटी रुपयांची नेट कमाई केली.

भाषेनुसार चित्रपटाची कमाई पुढीलप्रमाणे आहे:

इंग्रजी – 32.25 कोटी रुपये
हिंदी – 22.00 कोटी रुपये
तेलुगू – 3.25 कोटी रुपये
तमिळ – 3.00 कोटी रुपये
मल्याळम – 0.07 कोटी रुपये
कन्नड – 0.03 कोटी रुपये

भारतातील सर्वात मोठा हॉलीवूड ओपनर

या चित्रपटाने भारतात हॉलीवूड चित्रपटांच्या ओपनिंग कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ च्या नावावर 53.50 कोटी रुपयांच्या नेट ओपनिंगचा विक्रम होता. मात्र ‘ब्रँड न्यू डे’ ने 60.60 कोटी रुपयांची कमाई करत तो सहज मागे टाकला.

चित्रपटात कोण आहेत?

दिग्दर्शक डेस्टिन डॅनियल क्रेटन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात टॉम हॉलंड पुन्हा एकदा पीटर पार्कर/स्पायडर-मॅनच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्यासोबत झेंडाया, जेकब बॅटलन, जॉन बर्नथल आणि सॅडी सिंक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हा चित्रपट भारतात इंग्रजीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून, सुरुवातीच्या कमाईवरून पुढील काही दिवसांतही बॉक्स ऑफिसवर त्याची मजबूत घोडदौड कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts