Gen Z vs Ramdev Baba : NEET पेपरफुटी प्रकरण समोर आलं आणि देशभरातील वातावरण तापलं..CJP सह विद्यार्थी जंतरमंतरवर आंदोलनाला बसले आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला…प्रधान यांचा लवकर राजीनामा न झाल्याने GEN Z मुलांनी आंदोलनात अनेक पोस्टर आणले होते..त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रिल्स बनवल्या..या रिल्समध्ये आणि पोस्टवर जेन झी मुलांची वेगळीच भाषा होती…जेन झी मुलांसारखं आंदोलन आतापर्यंत भारतात झालंच नव्हतं…या जेन झीच्या आंदोलनासमोर गोदी मीडिया, बीजेपी आयटी सेल फेल ठरल्या..त्यांच्या मीम्सने देशासह विदेशातही आंदोलनाला महत्त्व मिळून दिलं…पण याच आंदोलावर भाजपकडून टीका होत आहे…भाजप खासदार कंगनाने उलट सुलट वक्तव्य केल्यानंतर आता रामदेव बाबांनीही प्रतिक्रिया दिली आहे…GEN Z मुळे भारताची बदनामी झाली, असं वक्तव्य त्यांनी केलं…यावरून कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंनी राम बाबांना धारेवर धरलं आहे..या व्हिडिओतून पाहूयात की खरंच GEN Z च्या आंदोलनामुळे देश बदनाम झालाय का? रामदेव बाबा भाजपची भाषा का बोलत आहेत? रामदेव बाबांना आता GEN Z काय उत्तर देणार? दीपकेंनी रामदेव बाबांवर काय म्हटलंय?
हेही वाचा : मुलं मोठी झाली की आई-वडील का एकटे पडतात? प्रत्येक कुटुंबाने वाचावा असा भावनिक लेख.
GEN Z आंदोलनावरून रामदेव बाबा विरुद्ध अभिजीत दीपके ( Gen Z vs Ramdev Baba )
जेन झीनं आंदोलन करून केंद्र सरकारला झुकवलं आहे…मोदी सरकारमध्ये कितीही आंदोलन झाले तरी कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा होत नव्हता..राजनाथ सिंह यांनी देखील म्हटलं होतं की हे UPA सरकार नाही, हे NDA सरकार आहे, यात मंत्र्यांचे राजीनामे होत नाही..पण असं असताना देखील जेन झीमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा नाईलाजाने मोदी सरकारला राजीनामा घ्यावा लागला..जेन झीने आंदोलन करत मोठं काम केलं असलं तरी आता जेन झी ला सोशल मीडियावर बदनाम केलं जात आहे..काल तुम्ही भाजप खासदार कंगना रनौतचं वक्तव्य पाहिलं असेल…आता रामदेव बाबांनी देखील GEN Z मुलांवर टीका केली आहे… GEN Z मुळे देश बदनाम झाला आहे, असं रामदेव बाबा म्हणाले..यामुळे आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंनी रामदेव बाबांचा चांगलाच समाचार घेतला आहे….यानंतर आता GEN Z देखील रामदेव बाबांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देत आहेत…आधी रामदेव बाबांनी काय म्हटलं हे पाहूयात आणि यानंतर दीपकेंनी कसं रामदेव बाबांना धारेवर धरलंय पाहूयात…
देश रस्त्यांवरून चालणार नाही.. देश केवळ संसदेच्या माध्यमातूनच चालवला जाईल… शिक्षणमंत्री कोण असेल, हे रस्त्यांवर ठरवले जाणार नाही.. देशाचे पंतप्रधान आणि संसद हे ठरवतील… काहींनी ‘आझादी’च्या घोषणा दिल्या, जसे की ‘ब्राह्मणवादापासून आझादी’, ‘आरएसएसपासून आझादी’. जर प्रल्हाद जोशी यांचा जन्म ब्राह्मण समाजात झाला असेल आणि त्यांनी आरएसएसकडून राष्ट्रवाद शिकला असेल, तर त्यामुळे कोणालाही अडचण वाटू नये.. देशाची राज्यघटना दलितांना आणि शोषितांना जसे अधिकार देते, तसेच ब्राह्मणांनाही अधिकार देते… त्यामुळे, ब्राह्मणवादाचा द्वेष करणे किंवा शिवीगाळ करणे हे घटनाबाह्य आहे.. तसेच शूद्रांचा अपमान करणे किंवा त्यांना शिवीगाळ करणे हे देखील घटनाबाह्य आहे..जनरेशन झेड’ मधील तरुण जंतरमंतरवर जमले आणि त्यांनी भारताची बदनामी केली.. शिवीगाळ करणे ही आपली संस्कृती किंवा स्वभाव नाही… आपण नेहमीच आपल्या ज्येष्ठांचा आदर केला आहे. आपण आपल्या पालकांनी आणि गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चाललो आहोत, असं रामदेव बाबा म्हणाले..
GEN Z आंदोलनावर रामदेव बाबांचे वक्तव्य का वादात आले? ( Gen Z vs Ramdev Baba )
यावरून अभिजीत दीपकेंनी रामदेव बाबांचा चांगलाच समाचार घेतला आहे…जेनरेशन झेडने देशाची बदनामी कशी केली..आपल्या हक्कासाठी, पेपर फुटी विरुद्ध लढणे, संविधानाच्या रस्त्याने जाणे, जयभीमच नारे देणे, हे जर संस्कृती बदनाम करणे असेल, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही संस्कृती बदनाम करतोय…तुम्ही जे पतंजलीचे प्रॉडक्ट बनवत आहे त्यावर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय त्याच्यावर लक्ष द्या.. अन्यथा पतंजली बंद पडून जायचं..संस्कृती आणि देश, जेन झी बऱ्याप्रमाणे सांभाळून घेऊ शकतात, असं अभिजीत दीपके म्हणाले…
रामदेव बाबा, भाजप आणि GEN Z वाद; सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटल्या? ( Gen Z vs Ramdev Baba )
विद्यार्थ्यांनी आंदोलन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांविरोधात केलं, मग रामदेव बाबांना का त्रास झाला, असा प्रश्न तुम्हालाही पडलं असेल…तर रामदेव बाबा आणि भाजपचे संबंध अत्यंत घनिष्ट असल्याचा आरोप आहे…
केंद्र सरकारने पतंजलीच्या उत्पादनांना थेट प्रोत्साहन दिले..तसंच पतंजली समूहाला विविध भाजपशासित राज्यांमध्ये जमिनी खरेदी करण्यासाठी तब्बल ४.६ कोटी डॉलर्सची (अंदाजे ४०० कोटींहून अधिक रुपये) सवलत मिळाली… काही ठिकाणी मोफत जमिनीही देण्यात आल्या, असा आरोप आहे…महाराष्ट्रात, नागपुरात २३० एकर जमीन अवघ्या २५ लाख रुपये प्रति एकर या दराने देण्यात आली होती, तर तिथला मूळ सरकारी दर १ कोटी रुपये प्रति एकर होता, असाही आरोप आहे…२०१४ नंतर स्वतंत्र ‘आयुष मंत्रालय’ स्थापन करण्यात आले.. पतंजलीच्या कोरोनिल सारख्या औषधांच्या उद्घाटन सोहळ्याला देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री स्वतः उपस्थित राहिले होते, ज्यामुळे पतंजलीला थेट सरकारी पाठबळ मिळाले..तर रामदेव बाबांनी देखील भाजपला मदत केल्याची चर्चा आहे… २०२० मधील कोरोना संकटाच्या काळात पतंजली समूहाने अधिकृतपणे पंतप्रधान नागरिक साहाय्यता निधीमध्ये २५ कोटी रुपयांचे मोठे योगदान दिले होते, अशीही चर्चा आहे..निवडणुकांमध्ये रामदेव बाबा भाजपला मोठी मदत करतात, असाही आरोप आहे…
यामुळेच, राजीनामा झालाय भाजपच्या नेत्याचा, आणि त्रास रामदेव बाबांना झालाय, अशी टीका होत आहे….तुम्हाला काय वाटतं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर रामदेव बाबांनी का प्रतिक्रिया दिली असेल…रामदेव बाबांनी जेनरेशन झेडवर का टीका केली असेल..कमेंट करून नक्की सांगा…








