vijay Chaudhary : राज्याच्या राजकारणात एका कथित ऑडिओ क्लिपमुळे सध्या खळबळ उडालीये…या कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, एकनाथ खडसे यांना शिवीगाळ करण्यात आली आहे…भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील ही कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे…यामुळे राजकारण कमालीचे तापले असून आता विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे..या व्हिडिओतून पाहूयात की शिवीगाळ करणारे विजय चौधरी कोण आहेत? चौधरींनी भाजपच्याच नेत्या रक्षा खडसेंना शिवीगाळ का केली? या शिवीगाळला भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची सहमती आहे का? या कथित ऑडिओ क्लिपवर गिरीश महाजनांनी काय प्रतिक्रिया दिली?
रक्षा खडसे कथित शिवीगाळ प्रकरण : विजय चौधरींचा राजीनामा ( Vijay Chaudhary )
राज्याच्या राजकारणातील पातळी दिवसेंदिवस घसरताना दिसत आहे…राजकारणात आधी खालच्या पातळीची टीका केली जात होती..मात्र आता राजकारणाची पातळी थेट शिवीगाळपर्यंत घसरली आहे…महाराष्ट्राची ओळख पुरोगामी महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र अशी आहे..पण याच महाराष्ट्राला नेते मंडळी बदनाम करताना दिसत आहे..महाराष्ट्राच्या राजकारणाचा एका प्रकारे बिग बॉस झाल्याचे दिसून येत आहे..काही नेते हिंदू-मुस्लिम करतात..तर काही नेते पत्रकार परिषदेत खालच्या भाषेचा वापर करतात..आता तर नेते फोन वरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत.. त्यामुळे हे नेते महाराष्ट्राला कोणत्या दिशेने नेत आहेत? असा प्रश्न निर्माण झालाय..
भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी हे थेट रक्षा खडसे, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांना शिवीगाळ करताना दिसत आहे…विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिपदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे…चौधरींनी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांना शिवीगाळ करत, यांचे काहीतरी केलं पाहिजे, असं म्हणताना दिसत आहेत…खडसे उठल्या सुटल्या घाणेरडे आरोप करतात , शिवीगाळ करतात. यांचं काहीतरी करावं लागेल.. रक्षा खडसे या मंत्रिमंडळात आहे.. ते एकाच घरात राहतात एकमेकांना मदत करतात.. हे कसं सहन करायचं आपण…पक्षाने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे..त्यांची दुहेरी भूमिका चालणार नाही, एक तर रक्षा खडसे यांनी राजीनामा द्यावा, नाहीतर त्यांनी तोंड बंद ठेवावं, अशी मागणी विजय चौधरी कथित ऑडिओ क्लिपमध्ये करताना दिसत आहे…
हेही वाचा : मोदींच्या व्हिडिओंवरून अभिजीत दीपकेंचा टोला; म्हणाले, “पंतप्रधानपद सोडा…
विजय चौधरींच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ( Vijay Chaudhary Audio Clip )
या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही..पण ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विजय चौधरींनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे…राजीनामा देताना विजय चौधरी यांनी विरोधकांनी बनावट क्लिप व्हायरल करून षड्यंत्र रचल्याचा थेट आरोप केला…ही ऑडिओ क्लिप पूर्णपणे बनावट आहे..AI चा वापर करून आवाज तयार करण्यात आला आहे..राजकीय बदनामी करण्यासाठी आणि पक्षात फूट पाडण्यासाठी विरोधकांनी हे कारस्थान रचला आहे.. माझ्यावरील आरोपांची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा…मी पदावर असताना चौकशी निष्पक्ष होणार नाही, म्हणूनच मी उत्तर महाराष्ट्र संयोजक पदावरून मुक्त होत आहे, असं विजय चौधरींनी म्हटलंय..
विजय चौधरी कोण आहेत?
विजय चौधरी यांनी भाजपमध्ये अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले आहे..तेली महासंघ महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्षही आहेत…नंदुरबारसारख्या काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या आदिवासी बहुल भागात भाजपची ताकद वाढवण्यात आणि स्थानिक पातळीवर पक्षाचे नेटवर्क भक्कम करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे… चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्याकडे भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, अशी मोठी जबाबदारी दिली होती..मात्र आता काही दिवसांपासून ते काही न काही वादात सापडताना दिसत आहेत..
गिरीश महाजनांची भूमिका काय? ( Girish Mahajan )
विजय चौधरी यांनी राजीनामा दिला असला तरी आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहे..या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मंत्री गिरीश महाजनच होते का? जर गिरीश महाजनच होते, तर त्यांनी विजय चौधरींना शिवीगाळ करण्यापासून का रोखले नाही? जळगावमधील राजकारण आता वैयक्तिक पातळीवर आणि शिवीगाळ पर्यंत घसरलं आहे का? भाजपने या कथित ऑडिओ क्लिपची चौकशी करून गिरीश महाजन यांच्यावरही कारवाई केली पाहिजे, अशी मागणी होत आहे…एकनाथ खडसे केवळ राजकीय आरोप करतात म्हणून त्यांच्या सुनेला आणि कन्येला अशा खालच्या भाषेत शिवीगाळ करणे योग्य आहे का? भाजपकडून असंच महिलांचा सन्मान सुरू आहे का? कधी भाजप खासदार कंगना रनौत महिलांवर अश्लील भाषेत वक्तव्य करते, तर विजय चौधरी शिवीगाळ करतात, हेच भाजपचे हिंदूत्व आणि महिलांचा सन्मान आहे का? असाही सवाल निर्माण झालाय…तुम्हाला काय वाटतं या कथित ऑडिओ क्लिपची चौकशी होऊन विजय चौधरी यांच्यासोबतच मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे का? कमेंट करून नक्की सांगा…









