Pankaja Munde : भाजप नेत्या आणि राज्याच्या राजकारणातील आघाडीचे व्यक्तिमत्त्व असलेल्या पंकजा मुंडे यांच्या रिटायमेंटच्या चर्चा होऊ लागल्या आहेत, मात्र पंकजा मुंडेंनी या चर्चांना अत्यंत आक्रमक उत्तर दिलंय, पण पंकजा मुंडेंच्या रिटायरमेंटच्या चर्चा एवढ्या लवकर करतंय कोण? या चर्चा नेमक्या पसरवल्या कुणाकडून जातायत? पंकजा मुंडे पुन्हा भाजपाच्या अंतर्गत षडयंत्राच्या बळी पडतायत का? आणि आता हा नवा डाव पंकजा मुंडे नेमक्या कशा पलटवून लावणार?
पंकजा मुंडेंच्या रिटायरमेंटच्या चर्चांना पूर्णविराम ( Pankaja Munde Retirement )
पंकजा मुंडेंनी आपल्या राजकीय संन्यासाच्या चर्चांवर अत्यंत आक्रमक शब्दांत स्पष्टीकरण दिले आहे. बीड जिल्ह्यातील केज येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात त्यांच्या निवृत्तीविषयी सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी एका फटक्यात पूर्णविराम दिला. मी इतक्यात राजकारणातून बाजूला होणार नाही, तर आधी माझ्या राजकीय प्रवासात अडथळे आणणाऱ्या दोन-चार लोकांना राजकारणातून कायमचे निवृत्त करेन आणि त्यानंतरच स्वतः निवृत्तीचा विचार करेन, असा थेट आणि खणखणीत इशारा त्यांनी आपल्या विरोधकांना दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, त्यांच्या निशाण्यावर नेमके कोण आहेत, याविषयी आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी एका कौटुंबिक आणि भावनिक वातावरणात बोलताना राजकारणाचा कधीकधी थकवा येतो आणि शांतपणे बाजूला व्हावेसे वाटते, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा चुकीचा अर्थ लावून काही लोकांनी पंकजा मुंडे आता सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याच्या तयारीत आहेत, अशा अफवा पसरवण्यास सुरुवात केली होती. या अफवांचा समाचार घेण्यासाठी त्यांनी केज येथील मंचाचा वापर केला. त्यांनी जनतेला संबोधित करताना स्पष्ट केले की, त्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. मी अत्यंत खमकी आणि कणखर नेत्या आहे, मला नेमके काय झाले आहे की मी आत्ताच निवृत्ती घेईन, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण अजूनही पूर्ण ताकदीने जनतेच्या सेवेसाठी मैदानात आहोत आणि संघर्ष सोडलेला नाही, हे त्यांनी आपल्या भाषणातून दाखवून दिले.
हेही वाचा : मोदींसोबत नाही, मग शरद पवारांचा प्लॅन काय? पुढची चाल नेमकी
बीडच्या राजकारणात पंकजा मुंडेंचा आक्रमक पवित्रा ( Pankaja Munde )
आपल्या वयाचा आणि ऊर्जेचा उल्लेख करत पंकजा मुंडे यांनी विरोधकांना सुनावले की, मी आता अवघ्या ४७ वर्षांची आहे. या वयात माझ्यामध्ये काम करण्याची, लढण्याची आणि जनतेचे प्रश्न मांडण्याची प्रचंड ऊर्जा आणि दम आहे. त्यामुळे ज्यांना असे वाटते की मी मैदान सोडून पळून जाईन, त्यांनी हा भ्रम डोक्यातून काढून टाकावा. जोपर्यंत माझ्यात काम करण्याची ताकद आहे, तोपर्यंत मी राजकारणात सक्रिय राहून लोकांसाठी धावत राहीन. मात्र, मला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि माझ्या मार्गात सातत्याने अडचणी निर्माण करणाऱ्या काही विशिष्ट लोकांना घरी पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, हा त्यांचा इशारा थेट स्थानिक पातळीवरील आणि राज्यातील काही बड्या नेत्यांना असल्याचे बोलले जात आहे.
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात कोणाचेही थेट नाव घेतले नसले तरी बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास पाहता, त्यांचा रोख कोणाकडे आहे हे समजणे कठीण नाही. त्यांचे पारंपरिक कौटुंबिक आणि राजकीय प्रतिस्पर्धी तसेच जिल्ह्यातील इतर मातब्बर नेत्यांवर त्यांनी हा प्रहार केल्याची चर्चा रंगली आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत आणि त्यात पंकजा मुंडे यांना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याचे स्पष्ट दिसत असून, आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. हे विधान केवळ स्थानिक पातळीपुरते मर्यादित नसून, पक्षांतर्गत असलेल्या त्यांच्या काही हितशत्रूंसाठीही एक सूचक संदेश मानला जात आहे.
गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने पंकजा मुंडे भावूक ( gopinath munde )
या जाहीर सभेत बोलताना पंकजा मुंडे आपल्या वडिलांच्या म्हणजेच लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने अत्यंत भावूक झाल्या. गोपीनाथ मुंडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य जनता, वंचित आणि कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी वेचले, याची आठवण त्यांनी करून दिली. मुंडे साहेब जर आज आपल्यात असते आणि त्यांना आणखी पाच वर्षांचे आयुष्य मिळाले असते, तर त्यांनी केवळ आणि केवळ जनतेच्या कल्याणासाठीच काम केले असते, अशी भावनिक भावना त्यांनी व्यक्त केली. वडिलांचा वारसा पुढे चालवताना आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला, तरीही जनतेचे प्रेम हीच आपली खरी ताकद आहे, असे त्या म्हणाल्या.
भाषणाच्या शेवटी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला विशेषतः तरुणांना एक महत्त्वाचे आवाहन केले. राजकारणात केवळ सत्ता मिळवणे हा आपला उद्देश नसून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी तरुणांना कोणत्याही चुकीच्या मार्गाला न लागता, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच, आपण नेहमीच भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक काम करण्यावर भर दिला असून, भविष्यातही याच मार्गाने चालत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पंकजा मुंडे यांच्या या आक्रमक आणि भावूक भाषणामुळे या ‘रिटायरमेंट’ चौकडीच्या विधानाची चर्चा दीर्घकाळ सुरू राहणार यात शंका ना









