Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • ठाकरेंच्या मोर्चात गब्बर, स्पायडरमॅन अन् ज्ञानेश कुमारांचा डुप्लिकेट! ठाकरेंच्या मोर्चात काय घडलं?
Mumbai

ठाकरेंच्या मोर्चात गब्बर, स्पायडरमॅन अन् ज्ञानेश कुमारांचा डुप्लिकेट! ठाकरेंच्या मोर्चात काय घडलं?

Thackeray Morcha 2026 | Mumbai Morcha
19

Thackeray Morcha 2026 : मुंबईच्या रस्त्यांवर आज जे घडलंय, ते महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. दोन भाऊ एकत्र आले… शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून धावले… पण या राजकीय गर्जनेपेक्षाही सर्वात जास्त चर्चा रंगली ती मुंबईच्या रस्त्यांवर उतरलेल्या कॅरेक्टर्सची…. निवडणूक आयोगाच्या विरोधातल्या या आंदोलनात थेट’स्पायडरमॅनची एन्ट्री झाली,’गब्बर रस्त्यावर उतरला आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा ड्युप्लिकेट तर दोरीने बांधलेल्या अवस्थेत आंदोलनात आणला गेला, राजकारणाचा हा कोणता नवा शोले आहे?

ठाकरेंच्या मोर्चात गब्बर आणि स्पायडरमॅनची एन्ट्री ( Thackeray Morcha 2026 )

मुंबईच्या रस्त्यांवर जनसागर उसळला आहे. पण या गर्दीत अचानक सगळ्यांच्या नजरा खिळल्या त्या एका लाल-निळ्या वेशभूषेकडे. होय, हॉलिवूडचा स्पायडरमॅन थेट ठाकरेंच्या मोर्चात अवतरला, पण हा स्पायडरमॅन हवेत जाळे टाकायला नाही, तर निवडणूक आयोगाच्या कारभाराचे वाभाडे काढायला आला होता. माझं जाळं सुटू शकतं, पण केंद्रीय यंत्रणांचं राजकीय जाळं कसं तोडायचं? असा उपरोधिक सवाल हा स्पायडरमॅन आपल्या फलकांतून विचारत होता. Gen Z आणि तरुण आंदोलकांनी या मोर्चाला एक वेगळंच रूप दिलं आहे.

स्पायडरमॅन पाठोपाठ एंट्री झाली ती थेट बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या व्हिलनची… म्हणजेच ‘गब्बरची, कितने आदमी थे? हा संवाद आता कितने मत चोरीला गेले? असा बदलला होता. शोले सिनेमातल्या गब्बरच्या स्टाईलमध्ये वेषांतर करून आलेल्या या कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर अत्यंत तिखट आणि धारदार शब्दांत हल्ला चढवला.

हेही वाचा : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात एल्गार का? राजीनाम्याच्या मागणीमागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z

ज्ञानेश कुमारांचा डुप्लिकेट दोरीने बांधून का आणला? ( Gyanesh Kumar Protest )

पण या सगळ्यात सर्वात जास्त धक्कादायक आणि धारदार चित्र होतं, ते ड्युप्लिकेट ज्ञानेश कुमारांचं, मुख्य निवडणूक आयुक्तांचा मुखवटा लावलेल्या एका व्यक्तीला प्रतिकात्मक रित्या दोरीने बांधून मोर्चात आणण्यात आलं होतं. निवडणूक आयोग स्वतंत्र नाही, तो कोणाच्या तरी इशाऱ्यावर नाचतोय, हा संदेश देण्यासाठी आंदोलकांनी ही उपरोधिक आणि आक्रमक कल्पना लढवली होती. निवडणूक यंत्रणेचा हा जाहीर आणि नाट्यमय निषेध सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या मोर्चात फक्त वेषांतरच नव्हतं, तर क्रिएटिव्हिटी ओसंडून वाहात होती. कार्यकर्त्यांच्या अंगावर होते खास डिझाईन केलेले टी-शर्ट्स. ज्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांचं एकत्र व्यंगचित्र होतं आणि खाली लिहिलं होतं. कि ‘ठाकरेंचा मोर्चा, देशभर चर्चा, राजकीय मोर्चाला हिंसक वळण न देता, केवळ तिरंगा हातात घेऊन आणि कलेचा, उपरोधाचा वापर करून यंत्रणेला कसं धारेवर धरता येतं, याचं हे जिवंत उदाहरण होतं.

ठाकरे बंधूंचा हा गर्जना मोर्चा हा राजकीय शक्तीप्रदर्शनाचा नाही, तर तो जनतेच्या मनातल्या संतापाचा एक कल्पक आविष्कार आहे. जेव्हा देशातील सर्वोच्च संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, तेव्हा सामान्य जनता रस्त्यावर उतरून कधी स्पायडरमॅन बनते, तर कधी गब्बर बनून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारते. ड्युप्लिकेट ज्ञानेश कुमारांना दोरीने बांधून केलेलं आंदोलन हे दाखवून देतं की, महाराष्ट्राची जनता आता गप्प बसणार नाही. राजकारणाचा हा नवा रंग आणि ठाकरांची ही नवी जुगलबंदी येणाऱ्या काळात काय वळण घेणार, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts