Uddhav Raj Thackeray March: मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ‘गर्जना मोर्चा’ची जोरदार तयारी सुरू झाली असून, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोर्चाची ( Mumbai Latest News ) जोरदार तयारी सुरू असून, पोलिसांकडूनही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काँग्रेसचा मोर्चाला पाठिंबा
या मोर्चामध्ये काँग्रेस सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतदार यादीशी संबंधित मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकार तसेच निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
हेही वाचा: ४ ऑक्टोबरला ग्रह-नक्षत्रांची मोठी हालचाल; ‘या’ राशींच्या आयुष्यात येणार नवा टर्निंग पॉइंट!
नाना पटोले यांच्या म्हणण्यानुसार, SIR आणि मतचोरीच्या अयोपांमुळे निवडणूक प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. लोकशाहीचे रक्षण करणे ही केवळ एका राजकीय पक्षाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट सुरक्षा
‘गर्जना मोर्चा’ मेट्रो सिनेमा चौकापासून मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट सुरक्षा
‘गर्जना मोर्चा’ मेट्रो सिनेमा चौकापासून मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत.
CSMT परिसरातील बीएमसी रोडवर मोर्चासाठी व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे. मेट्रो सिनेमाच्या दिशेने जाणारे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांची उपस्थिती
ठाकरे बंधूंच्या या आंदोलनाला काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे. याशिवाय शेतकरी कामगार पक्षानेही आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
मोर्चासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि आंदोलक मुंबईत दाखल होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली जात आहे.
मुंबईतील वाहतुकीवर परिणाम
मोर्चाच्या मार्गावरील काही रस्ते बंद करण्यात आल्याने दक्षिण मुंबईतील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या मोर्चाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.









