Breaking News :
  • Home
  • बिजनेस
  • UPI पेमेंटवर चार्ज लागणार का? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रांनी दिली महत्त्वाची अपडेट, जाणून घ्या संपूर्ण माहिती
बिजनेस

UPI पेमेंटवर चार्ज लागणार का? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रांनी दिली महत्त्वाची अपडेट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

UPI Charges

UPI Charges: UPI पेमेंटवर शुल्क आकारले जाणार असल्याच्या चर्चाना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी महत्वाची माहिती दिली आहे. UPI चार्ज, MDR शुल्क आणि सामान्य वापरकर्त्यांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत जाणून घ्या संपूर्ण अपडेट.

देशभरात डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. छोट्या व्यवहारांपासून ते मोठ्या आर्थिक व्यवहारांपर्यंत नागरिक मोठ्या प्रमाणावर UPI ((Unified Payments Interface) चा वापर करत आहेत. अशातच UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याच्या चर्चाना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गर्व्हनर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

हेही वाचा: कोयत्याचा हल्ला, घराबाहेर काढलं, आयुष्यात अनेक वादळं; उषा ताईंनी उलगडली आपल्या आयुष्याची कहाणी

UPI वर चार्ज आकारण्याबाबत अद्याप निर्णय नाही (RBI UPI Update)

UPI व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याच्या चर्चांवर RBI गव्हर्नरांनी सांगितले की, याबाबत सध्या विचार सुरू आहे. कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे UPI वापरणाऱ्या सामान्य नागरिकांनी सध्या चिंता करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

UPI मुळे डिजिटल व्यवहारांना मिळाली चालना

गेल्या काही वर्षांत UPI मुळे देशातील डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये मोठा बदल झाला आहे. पूर्वी रोख पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता, मात्र आता किराणा खरेदी, बिल पेमेंट, प्रवासाचे भाडे आणि इतर अनेक व्यवहारांसाठी नागरिक UPI चा वापर करत आहेत.

RBI चा उद्देश देशात डिजिटल पेमेंटचा वापर आणखी वाढवण्याचा असल्याचेही सांगण्यात आले आहे.

MDR म्हणजे काय?

MDR म्हणजे Merchant Discount Rate. हे एक प्रकारचे शुल्क असून डिजिटल पेमेंट व्यवहारांशी संबंधित असते. सध्या UPI व्यवहारांवर MDR शुल्क आकारले जात नाही.

काही अहवालांमध्ये भविष्यात ठराविक रकमेपेक्षा जास्त व्यवहारांवर शुल्क लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

सामान्य UPI वापरकर्त्यांवर परिणाम होणार का?

सोशल मीडिया आणि काही रिपोर्ट्समध्ये UPI वापरकर्त्यांना शुल्क भरावे लागेल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र सध्या उपलब्ध माहितीनुसार, रोजच्या छोट्या व्यवहारांवर त्वरित परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

दूध, भाजीपाला, किराणा सामान खरेदी, रिक्षा किंवा टॅक्सीचे भाडे अशा दैनंदिन व्यवहारांसाठी UPI वापरणाऱ्या ग्राहकांना सध्या कोणताही नवीन चार्ज लागू करण्यात आलेला नाही.

सरकारच्या विधेयकामुळे चर्चेला सुरुवात

पेमेंट आणि सेटलमेंट प्रणालीशी संबंधित प्रस्तावित बदलांमुळे UPI शुल्काबाबत चर्चा सुरू झाली आहे. या बदलांमध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट व्यवहारांशी संबंधित काही नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे.

मात्र या प्रस्तावांवर अजून चर्चा आणि विचार सुरू असून अंतिम निर्णयानंतरच याबाबत स्पष्ट माहिती मिळणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts