Usha Nadkarni Life Story: जेष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांचा खुलासा केला आहे. बालपणीचे संघर्ष, कुटूंबातील अडचणी, एकटेपणा आणि अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल त्यांनी मनमोकळेपणाने भाष्य करत आपल्या आयुष्याची भावनिक कहाणी सांगितली.
मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात (Marathi And Hindi Entertainment News) आपल्या दमदार अभिनयामुळे वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांचा प्रवास हा संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाचा आदर्श मानला जातो. पडद्यावर कठोर आणि प्रभावी भूमिका साकारणाऱ्या उषा यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक कठीण प्रसंग आले. कौटुंबिक अडचणी, वैवाहिक आयुष्यातील बदल, मुळापासूनच अंतर आणि एकटेपणाचा सामना करत त्यांनी आपलं करिअर यशस्वीपणे पुढे नेलं.
उषा नाडकर्णी (Usha Nadkarni Life) गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील (Mumbai) आपल्या घरात एकट्याच राहतात. सुरुवातीला एकटं राहण्याची भीती वाटत असली तरी कालांतराने त्यांनी त्याच्याशी जुळवून घेतलं. आज त्या कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचं आयुष्य आत्मविश्वासाने जगत आहेत.
हेही वाचा: “डबल गेम”चा आरोप करत जरांगेंचा शिंदेंवर हल्लाबोल; उद्धव ठाकरे….
वैवाहिक आयुष्यातही अनेक चढ-उतार (Usha Nadkarni Life Story)
त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही अनेक चढ-उतार आले. पतीपासून वेगळं झाल्यानंतरही त्यांनी कधीही कटुता मनात ठेवली नाही. आयुष्यात पुढे जात स्वतःच्या कामावर आणि जबाबदाऱ्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं.
उषा नाडकर्णी यांचा मुलगा
उषा नाडकर्णी यांचा मुलगा (Usha Nadkarni Son) सध्या परदेशात स्थायिक आहे. अभिनय क्षेत्रातील व्यस्त वेळापत्रकामुळे त्याच्या बालपणी आजीनेच त्याचा सांभाळ केला. त्यामुळे मुलगा आजही गंमतीने सांगतो की, त्याचं संगोपन आजीनेच केलं असून आईला त्याने वेगळ्याच नजरेने पाहिलं आहे.
सतत एकट्याच राहत
एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, 1987 नंतर त्या सतत एकट्याच राहत आहेत. सुरुवातीच्या काळात रात्री घरी परतताना असुरक्षित वाटायचं. त्यामुळे इमारतीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना घरापर्यंत सोबत येण्याची विनंती करायच्या. मात्र हळूहळू त्यांनी हा एकटेपणा स्वीकारला.
वृद्धापकाळातील एकटेपणाबद्दल बोलताना म्हणाले की
वृद्धापकाळातील एकटेपणाबद्दल बोलताना त्यांनी हलक्याफुलक्या अंदाजात म्हटलं की, एखाद्या दिवशी काही अनपेक्षित घडलं तर शेजाऱ्यांनाच सर्वप्रथम त्याची जाणीव होईल. त्यांच्या या वक्तव्यातून एकटं राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या भावना स्पष्टपणे दिसून येतात.
बालपण कसे गेलं?
उषा नाडकर्णी यांचं बालपणही अनेक कठीण अनुभवांनी भरलेलं होतं. त्यांच्या सांगण्यानुसार, वडिलांचा स्वभाव अत्यंत रागीट होता आणि घरात वारंवार कठोर शिस्त पाळली जायची. एकदा भावाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर कोयत्याने वार झाला आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. मात्र या जखमेची पर्वा न करता त्यांनी दुसऱ्याच दिवशी रंगभूमीवरील प्रयोगात सहभाग घेतला.
अभिनेत्री होण्याचं स्वप्न
अभिनेत्री होण्याचं स्वप्न त्यांनी लहानपणापासूनच पाहिलं होतं. मात्र सुरुवातीला त्यांच्या आईचा या निर्णयाला विरोध होता. अभिनय क्षेत्रात जाण्याचा निर्धार कायम ठेवताच त्यांच्या आईने त्यांना घराबाहेर जाण्यास सांगितलं. काही दिवस त्यांनी मैत्रिणीकडे राहून परिस्थितीचा सामना केला. त्यानंतर कुटुंबातील परिस्थिती बदलली आणि त्या पुन्हा घरी परतल्या.
अभिनय क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण
अनेक संकटांचा सामना करत उषा नाडकर्णी यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण (Marathi Actress) केलं. आजही त्या आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत असून त्यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.








