Mahesh Mote Raj Thackeray Reel : पुण्यातल्या एका रीलस्टारला राज ठाकरेंवर व्हिडिओ बनवणं चांगलंच भोवलंय, राज ठाकरेंवर आक्षेपार्ह रील बनवणाऱ्या महेश मोटेला मनसे नेत्यांनी जोरदार दणका दिलाय, मनसेच्या पदाधिकाऱ्याने महेश मोठेला तोंडाला काळ लावून उठबशा काढायला लावल्या, याच रील स्टारनं मध्यतरी एक व्हिडिओ बनवत असताना राज ठाकरे यांच्या बद्दल एक आक्षेपार्ह वीडियो बनवला होता, त्यांनतर मनसेचे पदाधिकारी मोटेच्या शोधात होते, केरळहून पुण्यात आल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महेश मोटे याला शोधून मनसेच्या कार्यालयात नेलं आणि डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा काढायला लावत माफी मागायला लावली आहे, ते व्हिडओ आता चर्चेचा विषय ठरताय पाहूयात…
राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप ( Mahesh Mote Raj Thackeray Reel )
अनेक रीलस्टार फेमस होण्याच्या किंवा चर्चेत येण्याच्या नादात उगाच असे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवतात आणि चर्चेत येतात. मात्र आपण कोणाबद्दल काय बोलतोय, याचं भान ते हरवतात आणि आपल्या व्हिडिओत तोंडाला येईल ते बोलत सुटतात, हा महेश मोटेही तेच करायला गेला, मात्र हे सगळे फंडे आजमावताना तो एक गोष्ट विसरला, ते म्हणजे समोर कोण आहे…मनसेचा संपूर्ण इतिहासच खळ्ळखट्याकचा राहिलाय आणि त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल व्हिडिओ बनवून हा कसा सुटेल, मनसे कार्यकर्त्यांनी याला गाठून चांगलाच धडा शिकवलाय…








