Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Mahalaxmi Express Robbery : महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा; महिलांचे दागिने लंपास, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न
महाराष्ट्र

Mahalaxmi Express Robbery : महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा; महिलांचे दागिने लंपास, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न

Mahalaxmi Express Robbery
22
Mahalaxmi Express Robbery :  रेल्वेने रात्रीचा प्रवास करताना प्रवाशांना सुरक्षिततेची चिंता सतावत असते. अशातच महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये मध्यरात्री घडलेल्या चोरीच्या घटनेने रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सातारा जिल्ह्यातील सालपे रेल्वे स्थानकाजवळ चोरट्यांनी सिग्नलची वायर कापून धावती ट्रेन थांबवली.

तब्बल १५ मिनिटे ट्रेन थांबल्यानंतर चोरट्यांनी एस-२, एस-३ आणि एस-५ या डब्यांमधील प्रवासी गाढ झोपेत असताना खिडकीजवळ बसलेल्या दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरून नेण्यात आले. या घटनेत सुमारे ५२ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे.

रात्रीच्या रेल्वे प्रवासात नेमकं काय घडलं?

रविवारी मध्यरात्री महालक्ष्मी एक्सप्रेस सातारा जिल्ह्यातील सालपे रेल्वे स्थानकाजवळून जात असताना हा प्रकार घडला. चोरट्यांनी रेल्वेची सिग्नल वायर कापल्यामुळे ट्रेन थांबली. ट्रेन थांबल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी रेल्वेच्या तीन डब्यांमधील प्रवासी आणि त्या वेळी बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. त्यामुळे चोरट्यांना चोरी करण्याची संधी मिळाली. (Mahalaxmi Express)

हेही वाचा : Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर जोशीमठाजवळ कोसळले; दुर्घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू

तीन डब्यांमध्ये प्रवेश, दोन महिलांचे दागिने चोरीला (Train Robbery)

चोरट्यांनी महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एस-२, एस-३ आणि एस-५ या डब्यांमधील खिडकीच्या बाजूला बसलेल्या दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरट्यांनी लंपास केले. संबंधित महिला कौटुंबिक कार्यक्रमासाठी कोल्हापूरला प्रवास करत होत्या. या चोरीत एकूण ५२ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.

१५ मिनिटे ट्रेन थांबली; रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल (Railway Passenger Safety)

सिग्नल वायर कापल्यामुळे ट्रेन सुमारे १५ मिनिटे थांबली होती. चोरीचा प्रकार रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर रेल्वे अधिकारी आणि लोहमार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

रात्रीच्या प्रवासात प्रवाशांनी काय काळजी घ्यावी? (passenger Care)

या घटनेमुळे विशेषतः रात्रीच्या रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे. रात्री प्रवास करताना दागिने आणि मौल्यवान वस्तू उघड्यावर न ठेवणे, सामानाची काळजी घेणे आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ रेल्वे कर्मचारी किंवा रेल्वे पोलिसांना माहिती देणे महत्त्वाचे आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी गस्त, डब्यांमधील देखरेख आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था किती सक्षम आहे, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

हेही वाचा :  रॅपिडो चालक निघाला दहशतवादी! मुंबईत दहशतवादी कटाचा संशय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts