Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • भारतात लवकरच लॉन्च होणार iQOO Z11; नवीन चिपसेट आणि दमदार फीचर्ससह करणार धमाकेदार एंट्री
विज्ञान- तंत्र

भारतात लवकरच लॉन्च होणार iQOO Z11; नवीन चिपसेट आणि दमदार फीचर्ससह करणार धमाकेदार एंट्री

iQOO Z11 India Launch
iQOO Z11 India Launch:  iQOO Z11 स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. नवीन media tek चिपसेट, प्रीमियम कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह हा फोन ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याची शक्यता आहे.

स्मार्टफोन प्रेमींनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता iQOO नेआपल्या आगामी iQOO Z11 च्या भारतीय लॉन्चची (iQOO Z11 India Launch) तारीख जाहीर केली आहे. कंपनी हा स्मार्टफोन २० ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात सादर करणार आहे. लॉन्चपूर्वी फोनशी संबंधित अनेक माहिती समोर आली असून, यात नवीन चिपसेट, आकर्षक डिझाइन आणि अत्याधुनिक डिस्प्ले फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

iQOO Z11 हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च (iQOO smartphone launch chin) झालेल्या मॉडेलमध्ये भारतीय बाजारासाठी वेगळ्या स्पेसिफिकेशनसह येऊ शकतो. कंपनी भारतीय ग्राहकांना लक्षात घेऊन यात नवीन MediaTek Dimensity 7500 Turbo प्रोसेसर देण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. या फोनची अपेक्षित किंमत ३० हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: मातीची भांडी घरी आणताय? थांबा! खरेदी करण्याआधी जाणून घ्या दिवस आणि वेळेचे हे नियम

भारतीय मॉडेलमध्ये दिसणार नवीन लूक

iQOO Z11 च्या भारतीय व्हेरिएंटच्या डिझाइनमध्ये (Android smartphone) बदल पाहायला मिळू शकतात. रिपोर्ट्सनुसार, चीनमधील मॉडेलपेक्षा याचा कॅमेरा मॉड्यूल वेगळा असेल. फोनमध्ये चौकोनी कॅमेरा सेटअपऐवजी आडव्या आकाराचा पिल-शेप कॅमेरा मॉड्यूल दिला जाऊ शकतो.

प्रोसेसरच्या बाबतीतही भारतीय व्हेरिएंटमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7500 Turbo चिपसेट दिला जाऊ शकतो, तर चीनमधील व्हेरिएंटमध्ये Dimensity 8500 प्रोसेसर असल्याचे सांगितले जात आहे. (iQOO news)

हाय रिफ्रेश रेटसह कर्व्ह्ड AMOLED स्क्रीन

iQOO Z11 मध्ये मोठा 6.83 इंचाचा 1.5K 3D कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. हा स्किन 144Hz रिफ्रेश रेट आणि ५००० निट्सपर्यंत ब्राइटनेस सपोर्ट करू शकतो. Lokshevay Latest Marathi News

डिस्प्लेसोबतच फोनच्या डिझाइनमध्येही प्रीमियम टच देण्यात येणार आहे (premium mid-range smartphone). कर्व्ह्ड बॅक पॅनेल, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि आकर्षक बॉडी डिझाइन यामुळे हा फोन मिड- रेंज सेंगमेंटमध्ये वेगळा ठरू शकतो.

फोनमध्ये पॉवर बटन आणि व्हॉल्यूम की उजव्या बाजूला मिळतील. तसेच स्पीकर आणि मायक्रोफोनची सुविधाही देण्यात येणार आहे. Aurora Green आणि Celestial Blue या रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. LS Marathi Channel

किंमत आणि उपलब्धता

कंपनीने अद्याप iQOO Z11 ची अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही. मात्र, लीक झालेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनची किंमत ₹29,999 ते ₹34,999 दरम्यान असू शकते.

लॉन्चनंतर हा स्मार्टफोन iQOO च्या अधिकृत वेबसाइट, प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ऑफलाइन स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नवीन प्रोसेसर, शानदार डिस्प्ले आणि आकर्षक डिझाइनमुळे iQOO Z11 ला भारतीय बाजारात चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

FAQ

1. iQOO Z11 भारतात कधी लॉन्च होणार?
उत्तर: iQOO Z11 स्मार्टफोन 20 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे.

2. iQOO Z11 मध्ये कोणता प्रोसेसर मिळू शकतो?
उत्तर: भारतीय व्हेरिएंटमध्ये MediaTek Dimensity 7500 Turbo प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे.

3. iQOO Z11 ची अपेक्षित किंमत किती असू शकते?
उत्तर: या स्मार्टफोनची किंमत अंदाजे ₹29,999 ते ₹34,999 दरम्यान असू शकते.

4. iQOO Z11 मध्ये कोणते प्रमुख फीचर्स मिळू शकतात?
उत्तर: 6.83-इंच 1.5K कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट, प्रीमियम डिझाइन आणि 5G सपोर्टसह अनेक आधुनिक फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts