• Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची नियुक्ती; सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची नियुक्ती; सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

NCP Nirmala Navale Appointment
NCP Nirmala Navale Appointment: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला असून युवती विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी जारी केलेल्या नियुक्तीपत्रात निर्मला नवले (NCP Nirmala Navale Appointment) यांच्यावर पक्षाच्या युवती विभागाची राज्यस्तरीय जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, संघटना मजबूत करणे आणि पक्षवाढीसाठी प्रभावीपणे काम करावे, असा विश्वासही नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: UPI पेमेंटवर चार्ज लागणार का? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रांनी दिली महत्त्वाची अपडेट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

यापूर्वी पक्षाकडून महिला प्रदेशाध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष आणि विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष यांच्या नियुक्त्याही जाहीर (NCP Youth Women’s State President) करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता युवती विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची नियुक्ती करण्यात आल्याने पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला आणखी गती मिळणार असल्याचे मानले जात आहे. (NCP leadership)

नियुक्तीनंतर निर्मला नवले यांच्यावर राज्यभरातील युवती कार्यकर्त्यांना संघटित करणे, पक्षाची विचारधारा प्रभावीपणे पोहोचवणे आणि आगामी राजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याची जबाबदारी असणार आहे. LS Marathi News Channel

दरम्यान, या नियुक्तीबद्दल पक्षातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून निर्मला नवले यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts