Breaking News :
  • Home
  • Top News
  • ऑगस्टमध्ये सुट्ट्यांचा धमाका! 6 दिवसांच्या लाँग वीकेंडसह जाणून घ्या संपूर्ण इव्हेंट कॅलेंडर एका क्लिकमध्ये
लाईफस्टाईल

ऑगस्टमध्ये सुट्ट्यांचा धमाका! 6 दिवसांच्या लाँग वीकेंडसह जाणून घ्या संपूर्ण इव्हेंट कॅलेंडर एका क्लिकमध्ये

August 2026 Calendar

August 2026 Calendar: ऑगस्ट महिना सुरू झाला असून या महिन्यात सण, सुट्ट्या, क्रीडा स्पर्धा, गॅझेट लॉन्च आणि मनोरंजनाची रेलचेल असणार आहे. स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, ओणम, मिलाद-उन-नबी यांसह महिनाभरात कोणत्या दिवशी काय घडणार, ते जाणून घेऊया.

ऑगस्ट महिना सुरू झाला असून या महिन्यात सण-उत्सव, सलग सुट्ट्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, गॅझेट व वाहन लॉन्च तसेच बहुप्रतिक्षित चित्रपट आणि OTT रिलीजमुळे उत्साहाचे वातावरण असणार आहे. स्वातंत्र्यदिन (Independence Day 2026) , रक्षाबंधन (Raksha Bandhan 2026) , ओणम आणि मिलाद-उन-नबी यांसारखे प्रमुख सण याच महिन्यात येत असल्याने अनेकांना लाँग वीकेंडचा (August Long Weekend) आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या घडामोडी, विशेष दिवस, जयंती-पुण्यतिथी आणि अन्य कार्यक्रमांमुळे ऑगस्ट महिना (August Special Days) घटनांनी गजबजलेला असणार आहे. त्यामुळे महिनाभरात कोणत्या दिवशी कोणता कार्यक्रम, सण किंवा महत्त्वाची घटना आहे, याची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी जाणून घेऊया.

हेही वाचा: राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर हल्ला; ‘तेल चोपडलं तरी बुद्धी नाही आली’

सलग 6 दिवस सुट्टीची संधी

ऑगस्ट महिन्यात सुट्ट्यांचे उत्तम नियोजन केल्यास सलग सहा दिवसांचा ब्रेक घेणे शक्य होणार आहे. 25 ऑगस्ट रोजी मिलाद-उन-नबी, 26 ऑगस्टला ओणम आणि 28 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने 27 ऑगस्टची एक दिवसाची रजा घेतल्यास 25 ते 30 ऑगस्टपर्यंत सलग सुट्टीचा आनंद घेता येईल. तसेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन आणि त्यानंतरच्या आठवड्याच्या सुट्ट्यांमुळेही छोट्या सहलीचे नियोजन करता येईल.

या महिन्यातील महत्त्वाचे बदल

ऑगस्टच्या सुरुवातीपासून रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत टोकन प्रणाली लागू होणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक पारदर्शक पद्धतीने तिकीट मिळण्यास मदत होईल. तसेच महाराष्ट्रात काही प्रशासकीय प्रक्रियांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे दिवस
1 ते 7 ऑगस्ट – जागतिक स्तनपान सप्ताह
2 ऑगस्ट – फ्रेंडशिप डे
7 ऑगस्ट – राष्ट्रीय हातमाग दिवस
8 ऑगस्ट – भारत छोडो आंदोलन दिवस
9 ऑगस्ट – जागतिक आदिवासी दिवस
12 ऑगस्ट – जागतिक हत्ती दिवस
13 ऑगस्ट – डावखुरा (लेफ्ट हँडर्स) दिवस
15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
19 ऑगस्ट – जागतिक छायाचित्रण दिवस
26 ऑगस्ट – महिला समानता दिवस
28 ऑगस्ट – संस्कृत दिवस
29 ऑगस्ट – राष्ट्रीय क्रीडा दिवस

आंतरराष्ट्रीय कार्यक्रम

8 ते 13 ऑगस्ट – मिस वर्ल्ड स्पर्धा (व्हिएतनाम)
12 ऑगस्ट – पूर्ण सूर्यग्रहण (भारतात दिसणार नाही)
27 ऑगस्ट – चंद्रग्रहण (भारतात दिसणार नाही)

पुण्यतिथी

1 ऑगस्ट – लोकमान्य टिळक
6 ऑगस्ट – किशोर कुमार
7 ऑगस्ट – रवींद्रनाथ टागोर
16 ऑगस्ट – अटल बिहारी वाजपेयी

व्यवसाय

3 ते 5 ऑगस्ट – रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक
11 ऑगस्ट – मायक्रोसॉफ्ट विंडोज 11 सुरक्षा अद्यतन बंद करणार
12 ते 15 ऑगस्ट – भारतीय व्यापार महोत्सव, नवी दिल्ली

जयंती

3 ऑगस्ट – मैथिलीशरण गुप्त
11 ऑगस्ट – खुदीराम बोस
19 ऑगस्ट – गुलाम अली
20 ऑगस्ट – राजीव गांधी
26 ऑगस्ट – मदर टेरेसा जयंती

गॅझेट लॉन्च

6 ऑगस्ट – Vivo S2
12 ऑगस्ट – Google Pixel 11 Series

क्रीडा

2 ऑगस्ट – कॉमनवेल्थ युवा क्रीडा स्पर्धा (ग्लासगो)
14 ते 30 ऑगस्ट – हॉकी विश्वचषक (बेल्जियम, नेदरलँड्स)
15 ऑगस्टपासून – भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा
17 ते 23 ऑगस्ट – बॅडमिंटन विश्व अजिंक्यपद स्पर्धा (नवी दिल्ली)
30 ऑगस्ट – यूएस ओपन टेनिस (न्यूयॉर्क)

वाहन लॉन्च

15 ऑगस्ट – Honda Elevate EV
15 ऑगस्ट – Mahindra XUV 3XO EV
15 ऑगस्ट – Mahindra Pick-Up Concept
18 ऑगस्ट – Skoda Slavia Facelift

चित्रपट प्रदर्शित

7 ऑगस्ट – प्रहार: द उत्कृष्ट निकम स्टोरी (गडकुमार राव, वामिका गब्बी)
14 ऑगस्ट – बंटवारा 1947 (सनी देओल, प्रीती झिंटा)
14 ऑगस्ट – अवतार 2: फायर अँड ॲश
14 ऑगस्ट – Alpha
26 ऑगस्ट – तारा सतारिया, कियारा अडवाणी, भावना कपूर

OTT रिलीज

1 ऑगस्ट – ब्लॅक वॉरंट सीझन 5
7 ऑगस्ट – मैं वापस आऊंगा
14 ऑगस्ट – कलेक्टेड 2
17 ऑगस्ट – लालटेण
28 ऑगस्ट – राखीची शपथ

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts