Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनानिमित्त यंदा २८ ऑगस्टला शेअर बाजाराला सुट्टी आहे की ट्रेडिंग सुरू राहणार, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता आहे. BSE-NSE सोबतच सोने-चांदीच्या व्यवहारांबाबतही जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट.
यंदा रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2026) सण 28 ऑगस्ट, शुक्रवार रोजी साजरा केला जाणार आहे. देशभरात भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा हा सण उत्साहात साजरा होत असताना, शेअर बाजारातील ( Share Market) गुंतवणूकदारांचे लक्ष मात्र बाजाराच्या सुट्टीकडे लागले आहे. रक्षाबंधनामुळे BSE आणि NSE वर व्यवहार बंद (share market holiday 2026) राहणार की नेहमीप्रमाणे ट्रेडिंग सुरू राहणार, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे. त्याचबरोबर सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी MCX वर ट्रेडिंगचे सत्र सुरू राहणार का, हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी शेअर बाजार (August 28 share market) आणि कमोडिटी मार्केटची स्थिती नेमकी काय असेल, याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेणे गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे आहे.
हेही वाचा: चार वर्षांची बंदी अखेर उठली! भारतीय गहू आता पुन्हा जगाच्या बाजारात
यंदा 28 ऑगस्टला कोणते व्यवहार सुरू राहतील?
रक्षाबंधनासाठी एक्सचेंजने स्वतंत्र ट्रेडिंग हॉलिडे जाहीर केलेला नाही. त्यामुळे २८ ऑगस्ट रोजी विविध प्रमुख सेगमेंटमध्ये व्यवहार करता येतील.
यामध्ये इक्विटी मार्केट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, NDS-RST आणि ट्राय-पार्टी रेपो या बाजारांचा समावेश आहे. म्हणजेच, रक्षाबंधनामुळे शेअर्सची खरेदी-विक्री थांबणार नाही.
सोने आणि चांदीचे ट्रेडिंग होणार का?
कमोडिटी मार्केटसाठी नियम वेगळे असतात. MCX वर सोने, चांदी आणि इतर कमोडिटीमध्ये व्यवहार एक्सचेंजच्या कमोडिटी हॉलिडे कॅलेंडरनुसार होतात. त्यामुळे रक्षाबंधणाच्या दिवशी सोने -चांदीमध्ये ट्रेडिंग करायचे असल्यास MCX च्या २०२६ अधिकृत ट्रेडिंग कॅलेंडरमधील त्या दिवसाची स्थिती तपासणे महत्वाचे आहे. शेअर बाजार सुरू आहे म्हणजे कमोडिटी बाजारही नक्कीच त्याच वेळेत सुरू असेल, असे गृहीत धरू नये.
पुढील चार महिन्यांतील शेअर मार्केटच्या सुट्ट्या कधी? (BSE holiday list 2026
रक्षाबंधनानंतर भारतीय शेअर बाजाराची पुढील नियोजित सुट्टी 14 सप्टेंबर 2026 रोजी गणेश चतुर्थीनिमित्त असेल. त्यानंतर पुढील चार महिन्यांत विविध सण आणि राष्ट्रीय दिवसांनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.
2 ऑक्टोबर 2026 — गांधी जयंती
20 ऑक्टोबर 2026 — दसरा
10 नोव्हेंबर 2026 — दिवाळी बलिप्रतिपदा
24 नोव्हेंबर 2026 — गुरु नानक जयंती
25 डिसेंबर 2026 — ख्रिसमस
काही सणांना अतिरिक्त सुट्टी का नाही?
2026 मध्ये काही मोठे सण शनिवार किंवा रविवारच्या दिवशी आले आहेत. त्यामुळे त्या दिवशी बाजार आधीच बंद असल्याने स्वतंत्र अतिरिक्त ट्रेडिंग हॉलिडे देण्यात आलेली नाही.
दिवाळी लक्ष्मीपूजन 8 नोव्हेंबरला रविवारी येत असल्याने त्या दिवशी नियमित ट्रेडिंग होणार नाही. मात्र दिवाळीनिमित्त मुहूर्त ट्रेडिंगचे विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे. त्याची अचूक वेळ एक्सचेंजकडून जाहीर केली जाईल.






