• Home
  • Top News
  • संभाजीनगर–नागपूर द्रुतगती महामार्गावर अपघात; दोन शिक्षकांसह तिघांचा मृत्यू
गुन्हा

संभाजीनगर–नागपूर द्रुतगती महामार्गावर अपघात; दोन शिक्षकांसह तिघांचा मृत्यू

Karanja Teacher Death
20

सचिन राणे | वाशिम प्रतिनिधी 

Karanja Teacher Death : संभाजीनगर–नागपूर द्रुतगती महामार्गावर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन शिक्षकांसह तिघांचा मृत्यू झाला. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजारजवळ असलेल्या तपोवन फाट्याजवळ हा अपघात घडला. या दुर्घटनेत कारंजा नगर परिषदेच्या उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आबिद हुसैन आणि शिक्षक नाजिम अहमद नूर अहमद यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील गंभीर जखमी लक्ष्मण चव्हाण यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

कार्यालयीन कामानिमित्त वाशिमकडे जाताना काळाचा घाला ( Shelubazar Accident )

मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा नगर परिषदेच्या उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आबिद हुसैन आणि शिक्षक नाजिम अहमद नूर अहमद हे कार्यालयीन कामानिमित्त वाशिमकडे जात होते. दरम्यान, संभाजीनगर–नागपूर द्रुतगती महामार्गावरील शेलूबाजारजवळील तपोवन फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीशी समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही शिक्षकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर मदतकार्य सुरू करण्यात आले.

हेही वाचा : Rajkumar Rao upcoming film : राजकुमार रावचा ‘प्रहार’ १६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला; ललित प्रभाकर साकारणार अजमल कसाब!

शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा ( Karanja Teacher Death )

या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील लक्ष्मण चव्हाण हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेने डॉ. राजेश सावरकर, आणि चालक राहुल खिल्लारे हे उपचारासाठी मंगरुळपीर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालाय. अपघातात दोन शिक्षकांसह तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

मुख्याध्यापक आबिद हुसैन आणि शिक्षक नाजिम अहमद नूर अहमद हे कार्यालयीन कामासाठी प्रवास करत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. कर्तव्याच्या निमित्ताने निघालेल्या दोन्ही शिक्षकांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या सहकारी शिक्षकांमध्ये आणि परिचितांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts