• Home
  • Top News
  • Rajkumar Rao upcoming film : राजकुमार रावचा ‘प्रहार’ १६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला; ललित प्रभाकर साकारणार अजमल कसाब!
मनोरंजन

Rajkumar Rao upcoming film : राजकुमार रावचा ‘प्रहार’ १६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला; ललित प्रभाकर साकारणार अजमल कसाब!

Rajkumar Rao upcoming film
35
Rajkumar Rao upcoming film : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा उलगडते. अविनाश अरुण दिग्दर्शित या चित्रपटात जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दमदार कलाकार आणि संवेदनशील विषयामुळे ‘प्रहार’बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

बॉलिवूड अभिनेता (Rajkumar Rao) राजकुमार राव याच्या आगामी (prahar)‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. नव्या लूकमध्ये आणि दमदार भूमिकेत दिसणारा राजकुमार राव या चित्रपटातून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. (Rajkumar Rao new movie) विशेष म्हणजे, या चित्रपटात मराठी (Lalit Prabhakar new role)अभिनेता ललित प्रभाकर अजमल कसाबच्या भूमिकेत दिसणार असल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘प्रहार’ हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : Educational Grant Schemes : महाराष्ट्रात दोन शैक्षणिक अनुदान योजना बंद; संस्कृत पाठशाळा आणि विशेष शाळांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह!

यापूर्वी प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला होता. दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी या चित्रपटाची निर्मिती वास्तव घटनांवर आधारित न्यायालयीन नाट्याच्या स्वरूपात केली आहे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Ajmal Kasab role) आरोपी अजमल कसाबविरुद्ध चाललेल्या खटल्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. चित्रपटात या खटल्यातील कायदेशीर लढाई, पुरावे आणि न्याय मिळवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न पाहायला मिळणार आहेत.

राजकुमार रावचा गंभीर आणि प्रभावी लूक यामुळे त्याच्या अभिनयाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटात अभिनेत्री वामिका गब्बी उज्ज्वल निकम यांच्या पत्नी ज्योती निकम यांची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे निकम यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची झलकही चित्रपटात पाहायला मिळू शकते. मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने लोकप्रिय झालेला ललित प्रभाकर या चित्रपटात अजमल कसाबची भूमिका साकारत आहे. रोमँटिक आणि विविधांगी भूमिकांमधून ओळखल्या जाणाऱ्या ललितचा हा वेगळा अवतार प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  शासकीय अधिकाऱ्याला मारहाण भोवली! युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष यांना ४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

या भूमिकेसाठी त्याने केलेले रूपांतर आणि व्यक्तिरेखेची मांडणी कशी असेल, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. अविनाश अरुण दिग्दर्शित या चित्रपटात राजकुमार राव, वामिका गब्बी आणि ललित प्रभाकर यांच्यासह जयदीप अहलावत, सिकंदर खेर आणि इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आता १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा ‘प्रहार’ प्रेक्षकांची किती पसंती मिळवतो, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts