पणजी / विशाल रेवडेकर, प्रतिनिधी
Nana Patekar Death: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी ते अस्वस्थ अवस्थेत आढळल्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी उपचारांचे प्रयत्न केले, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. या संपूर्ण घटनाक्रमाबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचे गोव्यात निधन झाले. पहाटे सुमारे ४.२० वाजता त्यांना गोव्यातील रुग्णालयात मृत अवस्थेत आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सीपीआर देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने पहाटे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित (Nana Patekar Heart Attack) करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट नसल्याने रुग्णालय प्रशासनाने हे मेडिको-लीगल प्रकरण म्हणून नोंदवले असून, पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे २.३० वाजता नाना पाटेकर (Nana Patekar Last Hours) यांनी आपल्या एका मित्राला संदेश पाठवून अस्वस्थ वाटत असल्याचे तसेच छातीच्या डाव्या बाजूला दुखत असल्याचे कळवले होते. मात्र रात्रीची वेळ असल्याने हा संदेश मित्राला वेळेवर लक्षात आला नसावा. त्यानंतर पहाटे सुमारे ४ वाजता त्यांचा मित्र त्यांच्या घरी पोहोचला. त्यावेळी नाना पाटेकर यांना धाप लागली होती आणि मोठ्या प्रमाणात घाम येत होता.
त्यानंतर त्यांच्या मित्राने केअरटेकरला बोलावले. केअरटेकर जवळच राहत असल्याने तो तातडीने त्यांच्या घरी पोहोचला. त्याने ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली. मात्र ॲम्ब्युलन्स पोहोचेपर्यंत नाना पाटेकर पूर्णपणे बेशुद्ध झाले होते आणि कोणताही प्रतिसाद देत नव्हते. त्यानंतर त्यांच्या घरीच सीपीआर सुरू करण्यात आला आणि सीपीआर देत त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत बराच उशीर झाला होता. अखेर पहाटे ५.२० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. Nana Patekar Breaking News
डॉक्टरांनी काय सांगितले?
नाना पाटेकर (Nana Patekar Death News) यांना रुग्णालयात मृत अवस्थेत आणण्यात आल्याने आणि त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण तत्काळ स्पष्ट नसल्याने रुग्णालय प्रशासनाने मेडिको-लीगल केस नोंदवली आहे. पोलिसांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात प्रक्रिया सुरू केली असून, नाना पाटेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांच्या मृत्यूसमयी त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य त्यांच्यासोबत नव्हता. मात्र त्यांचे काही मित्र आणि केअरटेकर उपस्थित होते. त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
गोव्यात घेतला नानांनी अखरेचा श्वास
नाना पाटेकर हे काही दिवसांपासून गोव्यात होते. दोन दिवसांपूर्वी ते एका कार्यक्रमासाठी गोव्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. ‘सम्राट’च्या राजश्री खांडेपारकर यांच्या पदग्रहण समारंभासाठी ते उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी तासाहून अधिक काळ भाषण केले होते. याच कार्यक्रमातील त्यांचे भाषण कदाचित शेवटचे ठरले असावे, अशी माहिती डॉक्टरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितली.
आरोग्यविषयीची माहिती
नाना पाटेकर यांची यापूर्वी रुग्ण म्हणून या रुग्णालयात उपचारासाठी नोंद झालेली नव्हती. त्यांच्या पूर्वीच्या आरोग्यविषयीची माहिती रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मृत्यू संशयास्पद आहे किंवा नाही, याचा तपास करणे ही पोलिसांची प्रक्रिया असून त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून, त्यानंतर नाना पाटेकर यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.









