PM Modi Independence Day Speech 2026: देशभरात ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत असताना राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा पार पडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर (Red Fort) तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.
“हर घर तिरंगा, हर मन तिरंगा,” असा संदेश देत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day India) शुभेच्छा दिल्या. तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून देशाच्या एकतेचे, अभिमानाचे आणि सामर्थ्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
देशाच्या काही भागांत निर्माण झालेल्या पूर आणि भूस्खलनाच्या परिस्थितीचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. संकटाच्या काळात संपूर्ण देश पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी देशाने एकजुटीने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा: प्रेम, पैसा आणि करिअरच्या दृष्टीने कोणासाठी खास आहे आजचा दिवस? जाणून घ्या तुमचं राशिभविष्य
भारत आज August 15 2026 नव्या संकल्पांसह पुढे जात असल्याचे सांगताना पंतप्रधान मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र (Viksit Bharat) बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. “२०४७ मध्ये विकसित भारत होणारच,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाने आता छोटी स्वप्ने पाहण्याऐवजी मोठी उद्दिष्टे निश्चित करून ती साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
“स्वप्न मोठी असतील, तर आपलं सामर्थ्यही वाढतं,” असे सांगत पंतप्रधानांनी तरुणाई, नवोन्मेष आणि देशाच्या सामूहिक शक्तीवर भर दिला.
यंदा ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षाच्या स्मरणाचाही विशेष उल्लेख करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणाऱ्या या गीताचा गौरव करणे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
एकीकडे देश विविध नैसर्गिक संकटांचा सामना करत असताना दुसरीकडे विकासाची गती कायम ठेवण्याचा निर्धार या भाषणातून व्यक्त झाला. नव्या संकल्पांसह आत्मविश्वासाने पुढे जाणारा भारत आणि २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचा संदेश लाल किल्ल्यावरून देशाला देण्यात आला.









