Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ‘दारू, ड्रग्स आणि…’; Gen Z बद्दल कंगना रनौतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सोशल मीडियावर खळबळ
मनोरंजन

‘दारू, ड्रग्स आणि…’; Gen Z बद्दल कंगना रनौतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सोशल मीडियावर खळबळ

Kangana Ranaut
Kangana Ranaut: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत हिने Gen Z पिढी आणि तरुण महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सोशल मीडियावर यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे आजच्या तरुण पिढीवर, विशेषतः Gen Z तरुणींवर कठोर टीका केली. स्वतंत्र आयुष्य जगण्याच्या संकल्पनेवर भाष्य करताना तिने काही तरुणी स्वातंत्र्याचा दावा करतात, मात्र त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारत नसल्याचा आरोप केला.

हेही वाचा: Happy Gurupornima! गुरुंना WhatsApp, Facebook आणि Instagram वर पाठवा खास मराठी शुभेच्छा

तिच्या पोस्टमध्ये कंगना म्हणाली की, स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहून करिअर घडवणाऱ्या महिलांप्रमाणे अनेक Gen Z तरुणी वागत नाहीत. त्या अजूनही कुटुंबाच्या आधारावर जगतात, मात्र स्वतःला पूर्णपणे स्वतंत्र असल्याचे दाखवतात, असा दावा तिने केला.

यापुढे तिने Gen Z पिढीचा उल्लेख “Generation Gutter” असा करत तीव्र शब्दांत टीका केली. या पिढीकडे समाजासाठी सकारात्मक योगदान देण्यासारखे काही नाही, असा दावा करत तिने काही तरुणींवर शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे, अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान आणि अनेक व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवण्याला स्वातंत्र्य समजण्याचा आरोप केला. तसेच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसतानाही पालकांवर अवलंबून राहतात, असेही ती म्हणाली.

याआधीही कंगना रनौतने विद्यार्थी आंदोलनावर भाष्य करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर टीका केली होती. त्या वेळी तिने आंदोलनाशी संबंधित व्हिडिओ पाहून “उलटी येण्यासारखे वाटते” अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच काही आंदोलनकर्त्यांचा उल्लेख “कॉकरोच” असा केल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts