Nanded Farmer Finance Company Death Case : नांदेड जिल्ह्यातील एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत (Nanded Farmer Death Case) आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत शिंदे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील रहिवासी होते. त्यांनी खासगी फायनान्स कंपनीकडून अवघे सात हजार रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत शिंदे (chandrakant shinde) यांना गावातून फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आणण्यात आल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यानंतर कंपनीच्या कार्यालयात त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नांदेडमध्ये खासगी फायनान्स कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह (Private Finance Company News)
दरम्यान, चंद्रकांत शिंदे यांच्या आईने आपल्या मुलाला फायनान्स कार्यालयात मारहाण करून गळफासावर लटकवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
अवघ्या सात हजार रुपयांच्या कर्जाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे खासगी फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीच्या पद्धतींबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि त्यांच्या आईने केलेल्या आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणात संबंधित यंत्रणांच्या तपासातून काय निष्पन्न होते, तसेच दोषींवर काही कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : शेतकरी कर्जमाफीची चौथी यादी जाहीर! तुमचं नाव नसेल तर काय कराल?









