Breaking News :
  • Home
  • देश
  • युद्ध पेटलं! अमेरिकेनं इराणला दिला थेट इशारा, म्हणाले, लवकरच आम्ही…
Top News

युद्ध पेटलं! अमेरिकेनं इराणला दिला थेट इशारा, म्हणाले, लवकरच आम्ही…

trump 2

US-Iran War | दिवसेंदिवस अमेरिका (America) आणि इराणमधील (Iran) यु्द्ध (War) जास्तच पेटताना दिसत आहे. या दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला असून मोठे हल्ले केले जात आहेत. अमेरिकेने इराणी युद्धनौकेला श्रीलंकेच्या हद्दीत लक्ष्य करत उद्ध्वस्त केले आहे. जेव्हा अमेरिकेने इराणी युद्धनौकेवर हल्ला केला तेव्हा जहाजावर 180 सैनिक होते. तर या हल्ल्यात 87 सैनिकांचा मृत्यू झाला असून इतर सैनिकांचा शोध सुरू आहे. तर या हल्ल्यानंतर अमेरिका आणखी आक्रमक झाली असून त्यांनी थेट इराणला इशारा दिला आहे.

हेही वाचा  – खामेनेई मेल्यानंतर इराणी महिलांचा डान्स होतोय व्हायरल, नेमका कसला आनंद?

अमेरिकेने दावा केला आहे की, आम्ही इराणची 20 पेक्षा जास्त इराणी जहाज बुडवले आहेत. तसेच इराणच्या नौसेनकडून गुडघे टेकण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्यांची ताकद कमी होताना दिसत आहे. अमेरिकन लष्कर या युद्धामध्ये अजून उतरलेले नाहीये. पण, जर गरज वाटली तर आमचे लष्कर जमिनीवर उतरून हल्ले करेल आणि इराणला चोख उत्तर देईल.

आम्ही इराणवर ताबा मिळवू, अमेरिकेचा दावा

लवकरच आम्ही इराणवर ताबा मिळवू. इराणला अमेरिकन आणि इस्त्रायली गुप्तचर संस्था त्यांच्या लढाऊ शक्तीने रोखतील. तसेच जमिनीवर लष्कराच्या उपस्थितीशिवाय आम्ही इराणच्या हवाई आणि जलमार्गावर नियंत्रण मिळवू, असा दावाही अमेरिकेचे युद्ध सचिव पीट हेगसेथ यांनी केला आहे. त्यामुळे आता इराणच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

इराणने अमेरिका आणि इस्त्रायल तळांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोन, मिसाईलचा वापर करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अमेरिकेच्या लष्कराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत इराणचे सर्व हल्ले हवेतच नष्ट केले. त्यानंतर आक्रमक झालेल्या अमेरिकेने इराणवर प्रतिहार केला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, या युद्धात अमेरिकेने इराणच्या 17 युद्धनौका पाण्यातच उद्धवस्त केल्या आहेत. तर 2000 हून अधिक लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

या हल्ल्याबाबत अमेरिकन सेंट्रल कमांडचे अधिकारी ब्रॅड कूपर यांनी म्हटलं आहे की, ओसामानचा उपसागर, अरबी समुद्र आणि होर्मुजची सामुद्रधुणीमध्ये इराणचे एकही जहाज शिल्लक राहिलेले नाहीये. त्यांचे नौदल आम्ही पूर्णपणे निकामी केले आहे”, असं ब्रॅड कूपर यांनी सांगितलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध आणखी वाढवण्याचे संकेत दिले होते. “मी इराणच्या सैन्य पोलिसांना आवाहन करतो की, त्यांनी हे हल्ले थांबवावेत आणि सुरक्षित राहावे. जर हल्ले नाही थांबवले तर पुढे मृत्यूसाठी तयार राहावे”, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts