भारतीयांचे महागड्या गाड्यांवरील प्रेम हे प्रचंड आहे. उद्योगपती, नेते, अभिनेते अशा गाड्या खरेदी करतातच. पण, वेगवेगळ्या खेळाडूंचं अशा महागड्या गाड्यांवरील विशेष प्रेम चाहत्यांना वेळोवेळी दिसून येतं. इतक्यातच टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि माजी कॅप्टन रोहित शर्माने अतिशय महागडी आणि दुर्मिळ अशी कार खरेदी केली आहे. त्यामुळे रोहित परत एकदा चर्चेत आला आहे. मध्यंतरी रोहितने आपली जुनी गाडी आपल्या एका चाहत्याला भेट दिल्यामुळे रोहितचे कौतुक झाले होते. रोहितने Tesla model Y ही कार खरेदी केली आहे. काळी टोपी आणि काळा टी शर्ट घालून टेस्ला कार चालवतानाचा रोहितचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. स्पेशल फीचर्स असलेल्या या गाडीचा नंबर देखील तितकाच विशेष आहे.
नंबर प्लेट मागील स्टोरी
रोहितच्या नवीन टेस्ला कारचा MH01 FB3015 हा स्पेशल नंबर रोहितने घेतला आहे. या नंबर वरून सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगली आहे. शेवटचे चार अंक रोहितसाठी खास आहेत. याचं रोहितच्या दोन्ही मुलांसोबत कनेक्शन समोर आलं आहे. रोहित आणि रितिकाचे 2015 ला लग्न झाले. त्यांना 30 डिसेंबर 2018 साली कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव आहे समायरा. तर,15 नोव्हेंबर 2024 रोजी रितिकाने एका मुलाला जन्म दिला. या दोन्ही जन्मतारखा बघितल्यास आपल्याला रोहितच्या कारच्या नंबरप्लेटचे कोडे उलगडेल. यामुळेच रोहितने हा नंबर घेतल्याची चर्चा आहे.
टेस्ला मॉडेल Y
जुलैमध्ये या कारचा भारतीय वाहन बाजारात प्रवेश झाला. स्पेशल सेफ्टी आणि ड्रायविंग फीचर्स ही कार एकदा चार्ज केल्यास 500 ते 622 किलोमीटर धावू शकते. 60 ते 70 लाखाच्या आसपास या कारची किंमत आहे .