Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • हातावर टाके घ्यावे लागतील एवढी इजा, तरीही अभिषेक शर्मा टुर्नामेंट खेळण्यासाठी मैदानात
Top News

हातावर टाके घ्यावे लागतील एवढी इजा, तरीही अभिषेक शर्मा टुर्नामेंट खेळण्यासाठी मैदानात

Abhishek Sharma injury

Abhishek Sharma injury : टी 20 वर्ल्ड कप 2026 सुरु असताना टीम इंडियाचा ओपनर फलंदाज अभिषेक शर्माबद्दल धक्कादायक खुलासा झाला आहे. टुर्नामेंट सुरु होण्याआधी अभिषेक शर्माला गंभीर दुखापत झाली होती. पण टीम मॅनेजमेंटने या बद्दल लपवून ठेवलं. पहिल्या सामन्यात दुखापत असूनही अभिषेक फलंदाजीसाठी मैदानात उतरला. टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये अजूनपर्यंतच त्याचं प्रदर्शन काही खास राहिलेलं नाही. चार सामन्यात त्याने 15 धावा केल्या. त्याच्या खराब प्रदर्शनामागे दुखापत हे सुद्धा एक कारण असल्याचे सांगितलं जात आहे.

हेही वाचा – “जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला;” अजितदादांबद्दल शोक व्यक्त करताना फडणवीस भावूक

मोठी दुखापत असून खेळण्याचा धोका का ?

टीमच्या ऑफिशियल फोटोशूट दरम्यान अभिषेकच्या हातावर कट होता. ही घटना इतकी गंभीर होती की, त्याच्या हातावर टाके घालावे लागलेले. मात्र, त्याची फिकिर न करता अभिषेक टुर्नामेंटच्या सुरुवातीच्या मॅचेसमध्ये खेळला होता. युएसए विरुद्ध सामन्यात तो फलंदाजीसाठी उतरला होता. या मॅचमध्ये तो शुन्यावर आऊट झाला. आता फॅन्स प्रश्न विचारतायत की, इतकी मोठी दुखापत असून खेळण्याचा धोका का पत्करला.

अभिषेक नामीबिया विरुद्ध तो खेळला नाही

दुसऱ्या सामन्यात आजारपणामुळे अभिषेक शर्मा बाहेर होता. पोटात बिघाड झाल्याचं कारण देण्यात आलं. टीम मॅनेजमेंटने अपडेट दिलेली की, पोटात इन्फेक्शन असल्यामुळे तो नामीबिया विरुद्ध तो खेळला नाही. अभिषेकला युएसए विरुद्ध खेळल्यानंतर रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. पोट दुखी यामागचं कारण सांगण्यात आलं होतं. पाकिस्तान विरुद्ध सामन्यातून त्याने मैदानावर पुनरागमन केलं. पण आता दुखापती संदर्भातील नवीन दाव्याने सगळेच हैराण झालेत.

सर्व सामन्यात शुन्यावर आऊट झाला

अभिषेक शर्मासाठी ही टूर्नामेंट अजूनपर्यंत तशी खास राहिलेली नाही. 4 सामन्यात त्याने 15 धावाचं केल्या आहेत. कालच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने या धावा केल्या. याआधी तो सर्व सामन्यात शुन्यावर आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मॅचमध्ये थोड्याफार धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. अन्य मॅचमध्ये तसा तो शुन्यावर आऊट झाला. आता फॅन्स या दुखापतीला त्याच्या फॉर्मशी जोडत आहेत. टीम इंडियाचा काल दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अन्य समीकरणही महत्वाची आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts