Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • आयपीएल मध्ये मोठ्या बदलाची चर्चा, 100 मिटर सिक्सला मिळणार आठ रन्स?
Top News

आयपीएल मध्ये मोठ्या बदलाची चर्चा, 100 मिटर सिक्सला मिळणार आठ रन्स?

IPL 2026

IPL 2026 : आयपीएल 2026 चा रोमांच शिखरावर असताना आकाश चोप्रा यांनी खेळ अधिक रोमांचक करण्यासाठी काही नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यांच्या मते असे बदल झाले तर क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल दिसू शकतात. आयपीएलमध्ये अनेकदा फलंदाज गोलंदाजांवर भारी पडताना दिसतात. पाटा पिचमुळे फलंदाज चौकार-षटकारांचा पाऊस पाडतात, पण खेळात संतुलन आणण्यासाठी आकाश चोप्रा यांनी बीसीसीआयला महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.

आकाश चोप्राचा पहिला सल्ला

आयपीएलमध्ये आकाश चोप्रा यांचा मोठा बदल असा आहे की, जर एखाद्या गोलंदाजाने 3 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या तर त्याला एक अतिरिक्त ओव्हर मिळावा. सध्या टी20 क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाला जास्तीत जास्त 4 ओव्हर टाकता येतात, पण या सल्ल्यानुसार 3 विकेट घेतल्यास गोलंदाजाला पाचवा ओव्हर टाकण्याची परवानगी मिळावी.

आकाश चोप्राचा दुसरा सल्ला

आकाश चोप्रा यांच्या मते, आयपीएल लीग स्टेजमध्ये जर एखाद्या टीमने मोठ्या फरकाने विजय मिळवला तर त्यांना अतिरिक्त पॉइंट मिळावा. जर एखादी टीम 15-16 ओव्हरमध्ये सामना जिंकते किंवा 40 किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी सामना जिंकते, तर त्यांना 2 ऐवजी 3 पॉइंट देण्यात यावेत.

आकाश चोप्राचा तिसरा सल्ला

तिसरा सल्ला असा आहे की, जर एखाद्या फलंदाजाने 100 मीटरचा षटकार मारला तर त्याच्या टीमला 6 ऐवजी 8 धावा मिळाव्यात. त्यांच्या मते, मोठा षटकार मारण्याच्या प्रयत्नात खेळाडू बादही होऊ शकतात, त्यामुळे सामना अधिक रोमांचक होईल.आकाश चोप्राचे हे तिन्ही सल्ले खूपच रोमांचक आहेत. जर बीसीसीआयने यांचा विचार केला, तर आयपीएलमध्ये नक्कीच मोठे आणि आकर्षक बदल पाहायला मिळू शकतात.

रोहित शर्माने याआधी केली होती मागणी

भारताचा सुप्रसिद्ध फलन्दाज रोहित शर्मा याने देखील काही वर्षांपूर्वी एका पत्रकार परिषदेत बोलताना असेच वक्तव्य केले होते ज्यात मोठ्या अंतराचा षट्कारला ८ धाव देण्याची मसागणी करण्यात आली होती. यामुळे या नव्या नियमबाबत परत एकदा चर्चाना उधन आलेले असून खरंच या नियमात बदल होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts