Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • टीम इंडियाची दमदार कामगिरी! अफगाणिस्तानचा ३०० धावांनी दारुण पराभव
Top News

टीम इंडियाची दमदार कामगिरी! अफगाणिस्तानचा ३०० धावांनी दारुण पराभव

Team India Dominant Performance

Team India Dominant Performance : जवळपास दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर देखील टीम इंडियाने आपली विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. शुबमन गिल याच्या नेतृत्वातील संघाने अफगाणिस्तानचा एकमेव कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी तब्बल ३०० धावांनी दारुण पराभव केला. टीम इंडियाने या सामन्यात अफगाणिस्तानवर एक डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघाचा पहिला डाव 8 विकेट्स गमावून 564 धावांवर घोषित केला. त्यानंतर भारताने अफगाणिस्तानला पहिल्या डावात 152 धावांवर गुंडाळून फॉलोऑन दिला. तर दुसऱ्या डावात 112 रन्सवर ऑलआऊट करत भारताने विजय मिळवला.

पहिल्या डावात २ शतकं आणि ३ अर्धशतके

भारतीय संघातील फलंदाजांनी पहिल्या डावात २ शतकं आणि ३ अर्धशतके झळकावली. या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी पहिवला डाव हा 127 ओव्हरमध्ये 8 आऊट 564 रन्सवर घोषित केला. टीम इंडियासाठी शुबमन गिल आणि केएल राहुल या दोघांनी दमदार शतके ठोकली. शुबमनने 126 तर केएलने 100 धावा केल्या.

साई सुदर्शन आणि ऋषभपंत प्रत्येकी 81 धावा

याशिवाय साई सुदर्शन आणि ऋषभपंत या दोघांनी प्रत्येकी 81 धावा मारल्या. ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर याने नाबाद 52 धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही छोटेखानी खेळी करत भारताला 550 पार पोहचवण्यात हातभार लावला. अफगाणिस्तानासाठी मोहम्मद सलीम साफी याने सर्वाधिक 6 विकेट्स मिळवल्या. अफगाणिस्तानला पहिल्या डावात काही खास करता आलं नाही. भारताने अफगाणिस्तानला 58.4 ओव्हरमध्ये 152 रन्सवर ऑलआऊट केलं. अफगाणिस्तानसाठी रहमत शाह याने सर्वाधिक 60 रन्स केल्या. तर कॅप्टन हशमतुल्लाह शाहीदी याने 20 धावांचं योगदान दिलं. त्याव्यतिरिक्त कुणालाही 20 हा आकडा गाठता आला नाही.

अफगाणिस्तानला 35.5 ओव्हरमध्ये 112 रन्सवर ऑलआऊट

भारतीय संघाकडून डेब्युटंट मानव सुथार याने सर्वाधिक 6 विकेट्स मिळवल्या. प्रसिध कृष्णा याने तिघांना आऊट केलं. तर वॉशिंग्टन सुंदर याने 1 विकेट मिळवत अफगाणिस्तानचं पॅकअप करण्यात योगदान दिलं. क्रिकेट चाहत्यांना सामन्यातील तिसऱ्या आणि अफगाणिस्तानच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांची कमाल पाहायला मिळाली. भारताने अफगाणिस्तानला 35.5 ओव्हरमध्ये 112 रन्सवर ऑलआऊट केलं.

सेदीकुल्लाह अटल याने सर्वाधिक 42 धावा केल्या

अफगाणिस्तानसाठी सेदीकुल्लाह अटल याने सर्वाधिक 42 धावा केल्या. रहमानुल्लाह गुरुबाझ याने 24 आणि रहमत शाहने 13 धावा दिल्या. त्याव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं नाही. वॉशिंग्टन सुंदर याने दुसऱ्या डावात 4 विकेट्स मिळवल्या. कुलदीप यादव याने तिघांना आऊट केलं. तर मोहम्मद सिराज आणि मानव सुथार या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts