Sourav Ganguly on Vaibhav Suryavanshi : सध्या क्रिकेट विश्वात सर्वात जास्त चर्चा कोणाची रंगत असेल तर ते नाव आहे अवघ्या १५ वर्षाच्या वैभव सुर्यवंशीचे. वैभवला पद, पैसा, प्रसिद्धी सर्वकाही कमी वयात मिळालं आहे. मात्र, यामागे त्याचे कष्ट आणि परिश्रम आहे. केवळ १५ वर्षात वैभवची भारतीय अंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. त्यामुळे सध्या तरी क्रिकेट क्षेत्रात सर्वात चर्चेत असलेल्या खेळाडूंमध्ये वैभवचे नाव आवर्जून घ्यावे लागते. त्याने एवढ्या कमी वयात असे काही विक्रम केले आहेत, त्यामुळे त्याच्यावर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय.
अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंकडून त्याचे कौतुक केलं जात आहे. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुली याला अपवाद ठरला आहे. त्याने कौतुक न करता त्याला वास्तवाची जाणीव करून दिलीय. गांगुलीच्या मते आयपीएल खेळणं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं यात खुप फरक आहे. त्याने आयपीएलमध्ये आवश्य कौतुकास्पद कामगिरी केली आहे मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी तेवढं सोपं असणार नाही. इथे खुप मोठा दबाव असतो आणि आव्हाने असतात.
एशियन गेम्स २०२६ मध्ये देखील निवड
त्यामुळे आर्यलंड आणि इंग्लंड दौऱ्याशिवाय वैभव सुर्यवंशीची एशियन गेम्स २०२६ मध्ये देखील निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काळात वैभव ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हाने पेलवून आपल्या जल्वा कायम ठेवतो का? की सौरभ गांगुली म्हणतो तसे त्याला बळी पडतो हे येत्या काही दिवासांत पाहायला मिळणार आहे.
लोकांनी वैभवकडून कुठल्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नये
“सौरव गांगुलीच्या मते वैभव सूर्यवंशी आता फक्त 15 वर्षांचा असून लोकांनी त्याच्याकडून कुठल्याही चमत्काराची अपेक्षा ठेऊ नये. वैभव अजून बरचं काही शिकणार आहे. टीम इंडियात खेळताना कदाचित त्याच्यावर जास्त दबाव नसेल. इंग्लंड आणि आयर्लंडमधली परिस्थिती वेगळी असेल. स्विंग होणारे चेंडू खेळणं भरपूर कठीण असतं” असा सौरव गांगुलीने न्यूज एजन्सी पीटीआयशी बोलताना वैभव सुर्यवंशीला इशारा दिला आहे.
वैभवसाठी टीम इंडियाकडून खेळणं एक वेगळा अनुभव
“वैभवसाठी टीम इंडियाकडून खेळणं एक वेगळा अनुभव असेल. आता तो अशा पीचेसवर खेळणार आहे, जे भारतापेक्षा वेगळे आहेत. चेंडू सीमा होणार, जास्त बाऊन्स असेल. नव्या चेंडूत मूवमेंट सुद्धा असेल. तिथली परिस्थिती वेगळी असेल. पण मला वाटतं वैभवकडे प्रतिभेची कमी नाही” असं सौरव गांगुली म्हणाला.
टीम इंडियात सेटल होण्यासाठी वैभव सूर्यवंशीला वेळ दिला पाहिजे असं सौरव गांगुलीचं मत आहे. 15 वर्षाच्या खेळाडूकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुठल्याही चमत्काराची अपेक्षा ठेवणं चुकीच आहे असं गांगुली म्हणाला. 26 जून आणि 28 जून रोजी टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध दोन टी20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड दौरा असेल.












