Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “अजित पवार मेला तरी मला फरक नाही”; दादांचा कार्यकर्ता काय बोलून गेला…
Top News

“अजित पवार मेला तरी मला फरक नाही”; दादांचा कार्यकर्ता काय बोलून गेला…

Ajit Pawar Dies

Ajit Pawar Dies : ज्या बारामतीवर राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीवाच्या पलीकडे प्रेम केलं. त्याचं मातीत जन्मले आणि त्याच मातीत त्यांच्यावर अंतसंस्कार करण्यात आले. मात्र, दादांना जाऊन चार महिने काय झाले आणि त्यांच्या माघारी त्यांच्यावर खालच्या भाषेत बोलणारे त्यांच्याच जीवाची माणसं समोर आली. सध्या बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये खुप खालची भाषा बोलण्यात आली आहे. विशेष म्हणजे अजितदादांनी ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, तोच हा नगरसवेक आहे. अजित पवार जवळचा आणि त्यांच्याच पक्षाचा हा नगरसेवक असणं आणखी वेदनादायक ठरणारं आहे. अजित पवार ज्या किशोर मासाळचं भरभरुन कौतुक करायचे तोच असं बोललाय कोणालाही विश्वास बसणार नाही मात्र ते खरं आहे. अजित पवार यांच्या आवडत्या लोकांच्या यादीत तो होता. पण तोच किशोर मासाळ आता अजित पवारांबद्दल जे बोलला, त्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

एका महिलेबरोबर बोलताना किशोर मासाळची क्लिप व्हायरल

अजित पवार मेला त्याने मला फरक पडला नाही, असे या नगरसेवकाचे शब्द आहेत. एका महिलेबरोबर बोलतानाचा किशोर मासाळची क्लिप व्हायरल झाली आहे. राजकारणात लोक किती कृतघ्न असतात, त्याचं हे उत्तम उदहारण आहे. हा किशोर मासाळ ज्या महिलेबरोबर बोलतोय त्यात बिअर पिण्याचा सुद्धा उल्लेख आहे. रुपाली ताई मेली पाहिजे, अजित पवार मेला त्याने मला फरक पडला नाही असं हा मासाळ म्हणतो. त्याचवेळी फोनवर बोलणारी महिला म्हणते मी मेली तरी तुला फरक पडणार नाही, त्यावर तो नाही फरक पडणार असं बोलतो.

किशोर मासाळच्या नगरसेवक पदाच्या राजीनाम्याची मागणी

नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी केलेल्या बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सह्योगी पक्षाच्या नगरसेवक-नगरसेविकांनी त्यांच्या नगरसेवक पदाच्या राजीनाम्याची मागणी करणारे सह्यांचे निवेदन सादर केले. यावेळी सर्व नगरसेवकांनी सहयोग या निवासस्थानी जाऊन अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांचे ओएसडी सचिन यादव यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts