Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • सोन्याने घेतली भरारी! दरवाढीमुळे गुंतवणूकदार मालामाल; जाणून घ्या एका तोळ्याचा नवा भाव
Top News

सोन्याने घेतली भरारी! दरवाढीमुळे गुंतवणूकदार मालामाल; जाणून घ्या एका तोळ्याचा नवा भाव

Gold Price Today India
49

Gold Price Today India: आंतरराष्ट्रीय घडामोडींचे पडसाद आता सराफ बाजारातही उमटू लागले आहेत. सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली असून अवघ्या काही दिवसांत प्रति तोळा किमतीत हजारो रुपयांची भर पडली आहे. चांदीच्या दारातही जोरदार तेजी पाहायला मिळत असून गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. अशा परिस्थितीत आज एका तोळा सोन्यासाठी नेमके किती रुपये मोजावे लागणार, जाणून घेऊया ताजे दर.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे आर्थिक बाजारपेठांमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी शक्यता व्यक्त होताच गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढला असून त्याचा थेट परिणाम मौल्यवान धांतूंच्या किमतींवर झाला आहे.

हेही वाचा: देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; सोलापूरमध्ये पिकअप विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू

सोन्याच्या दरात मोठी झेप

आजच्या व्यवहारात सोन्याच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली. मागील सत्रात प्रतितोळा सुमारे १.४८ लाख रुपायंवर असलेले सोने आता १.५१ लाख रुपयांच्या पुढे पोहोचले आहे. काहीच दिवसांत सोन्याच्या दरात हजारो रुपयांची वाढ झाल्याने बाजारात खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघांचेही लक्ष वेधले गेले आहे.

चांदीही तेजीत

सोन्यासोबतच चांदीच्या दारातही मोठी वाढ दिसून आली आहे. प्रतिकिलो चांदीच्या भावात जवळपास १० हजार रुपयांची वाढ झाल्याने बाजारातील तेजी अधिक ठळक झाली आहे. उद्योग क्षेत्रातील मागणी आणि गुंतवणूकदारांची वाढती रुची यामुळे चांदीच्या किमतींनाही आधार मिळत आहे.

पुढील काळात आणखी वाढीची शक्यता

बाजार विश्लेषकांच्या मते, जागतिक आर्थिक घडामोडी आणि भू- राजकीय परिस्थिती लक्षात घेता सोने व चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थैर्य होण्याच्या प्रक्रियेदरम्यान गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून मौल्यवान धातूंना प्राधान्य देत आहेत.

शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण

आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव कमी होण्याच्या बातम्यांनंतर भारतीय शेअर बाजारातही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रमुख निर्देशांकांमध्ये वाढ नोंदवली गेली असून बँकिंग, आयटी आणि औद्योगिक क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदी वाढल्याचे दिसून आले.

कच्चा तेलाच्या किमतींवर परिणाम

जागतिक परिस्थिती सुधारण्याच्या संकेतांमुळे कच्चा तेलाच्या किमतींमध्ये काही प्रमाणात नरमाई आली आहे. यामुळे आयात खर्चावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आर्थिक स्थैर्य वाढल्यास विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीलाही चालना मिळू शकते.

एकूणच, जागतिक पातळीतील बदलत्या घडामोडींमुळे सोने, चांदी आणि शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ- उतार सुरू असून आगामी काळात गुंवणूकदारांचे लक्ष या बाजाराकडे राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts