Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • परीक्षा नाही, मेरिटवर होणार निवड! इंडियन ऑईलमध्ये 433 अप्रेंटिस पदांची भरती; कोणाला करता येणार अर्ज?
एजुकेशन- जॉब

परीक्षा नाही, मेरिटवर होणार निवड! इंडियन ऑईलमध्ये 433 अप्रेंटिस पदांची भरती; कोणाला करता येणार अर्ज?

IOCL Apprentice Recruitment 2026
2
IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या मार्केटिंग विभागात अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण ४३३ पदे भरली जाणार आहेत. ITI, बारावी, इंजिनिअरिंग डिप्लोमा तसेच विविध शाखांतील पदवीधारकांसाठी ही चांगली संधी आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना १२ महिन्यांच्या अप्रेंटिसशिप (IOCL Apprentice Recruitment 2026) कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही भरती उत्तर भारतातील ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विविध ठिकाणांसाठी करण्यात येत आहे. या भरतीसाठी ही अर्ज प्रक्रिया 7 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना 6 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

हेही वाचा: एकच आक्रोश… अमरावतीच्या NICU मध्ये भीषण आग; 3 नवजात चिमुकल्यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

कोणत्या पदांसाठी किती जागा?

IOCL च्या या भरतीमध्ये (IOCL Apprentice Recruitment 2026) चार प्रकारच्या अप्रेंटिस पदांचा समावेश आहे.

ट्रेड अप्रेंटिस: 104 पदे
डेटा एन्ट्री ऑपरेटर: 69 पदे
टेक्निशियन अप्रेंटिस: 156 पदे
ग्रॅज्युएट अप्रेंटिस: 104 पदे

अशा प्रकारे एकूण 433 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

परीक्षेशिवाय होणार निवड

या भरतीचे (IOCL Apprentice Vacancy 2026) वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना लेखी परीक्षा किंवा मुलाखतीला सामोरे जावे लागणार नाही. उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रतेतील गुणांच्या आधारे तयार होणाऱ्या मेरिट लिस्टनुसार केली जाणार आहे. त्यामुळे चांगले शैक्षणिक गुण असलेल्या उमेदवारांसाठी ही संधी महत्वाची ठरू शकते.

कोण करू शकतो अर्ज?

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी (IOCL Vacancy) संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र (ITI Jobs 2026) आवश्यक आहे. यामध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, सिव्हिल यांसारख्या ट्रेडचा समावेश आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर (IOCL Data Entry Operator) पदासाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा, तर ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी BA, B.Com, B.Sc किंवा BBA यांसारखी पदवी आवश्यक आहे.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 50 टक्के गुण, तर SC, ST आणि PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 45 टक्के गुण आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय आणि शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ही कट-ऑफ तारीख ग्राह्य धरली जाणार आहे.

अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवारांनी संबंधित NAPS/NATS पोर्टलवर नोंदणी करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर भरतीच्या अधिसूचनेनुसार अर्ज सादर करावा.

भरतीची पात्रता, पदनिहाय तपशील, राज्यनिहाय जागा आणि अर्ज प्रक्रियेची अधिकृत माहिती तपासण्यासाठी उमेदवारांनी IOCL च्या अधिकृत संकेतस्थळावरील Apprentice Recruitment विभागाला भेट देणे आवश्यक आहे.

महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपली पात्रता आणि अर्जाची अंतिम तारीख निश्चित करावी.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts