Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेखी परीक्षा नाही, थेट मेरिटवर निवड! रेल्वे अप्रेंटिसच्या 2008 जागांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया
एजुकेशन- जॉब

लेखी परीक्षा नाही, थेट मेरिटवर निवड! रेल्वे अप्रेंटिसच्या 2008 जागांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

Railway Apprentice Recruitment 2026
47
Railway Apprentice Recruitment 2026: रेल्वेत अप्रेंटिस करण्याची इच्छा असलेल्या 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. नॉर्थ वेस्टर्न रेल्वेने 2008 अप्रेंटिस जागांसाठी भरती जाहीर केली आहे. चला तर जाणून घेऊयात अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि महत्त्वाच्या तारखा.

रेल्वे विभागात अप्रेंटिस (Railway Apprentice Recruitment 2026) म्हणून प्रशिक्षण घेऊन करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. नॉर्थ वेस्टर्न रेल्वे ( NWR) अंतर्गत अप्रेंटिसच्या (Railway Apprentice Vacancy 2026) एकूण २००८ प्रशिक्षण जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत.

या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांची निवड करण्यासाठी स्वतंत्र लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. अर्जदारांच्या शैक्षणिक गुंणाच्या आधारे मेरिट तयार करून निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. ( NWR Apprentice Recruitment 2026 )

हेही वाचा: पुण्यातील टॉप 5 दुर्गापूजा; बंगाली पद्धतीचा उत्सव अनुभवायचा असेल तर ‘ही’ ठिकाणं नक्की गाठा!

अर्ज प्रक्रिया

NWR अप्रेंटिस या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ७ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असून, ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता. नॉर्थ वेस्टर्न रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrcjaipur.in ला भेट द्यावी.

कोणत्या विभागात भरती होणार आहे?

या अप्रेंटिस भरतीमध्ये रेल्वेच्या विविध विभाग आणि युनिटमध्ये वेगवेगळ्या तांत्रिक ट्रेडसाठी प्रशिक्षणाच्या जागा उपलब्ध आहेत.

यामध्ये प्रामुख्याने:

फिटर

इलेक्ट्रिशियन

डिझेल मेकॅनिक

वेल्डर

कारपेंटर

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट

2008 अप्रेंटिस स्लॉटचे असे आहे वाटप

या भरतीमध्ये नॉर्थ वेस्टर्न रेल्वेच्या विविध विभागांमध्ये एकूण 2008 अप्रेंटिस प्रशिक्षण स्लॉट उपलब्ध आहेत.

रेल्वे विभाग / युनिट प्रशिक्षण स्लॉट

DRM ऑफिस, अजमेर 500
DRM ऑफिस, बिकानेर 524
DRM ऑफिस, जयपूर 580
DRM ऑफिस, जोधपूर 134
BTC कॅरेज, अजमेर 101
BTC लोको, अजमेर 69
कॅरेज वर्कशॉप, बिकानेर 33
कॅरेज वर्कशॉप, जोधपूर 67
एकूण 2008

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 10वीची परीक्षा किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर संबंधित ट्रेडमध्ये ITIचे प्रशिक्षण आणि National Trade Certificate (NTC) असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र NCVT किंवा SCVT कडून मिळालेले असावे.

म्हणून केवळ 10वी उत्तीर्ण असणे पुरेसे नाही; संबंधित ट्रेडची आवश्यक ITI पात्रताही उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

अर्जदाराचे वय 6 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असावे.

आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना लागू असलेल्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळू शकते.

अर्जासाठी किती शुल्क?

या भरतीसाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांमध्ये ज्या उमेदवारांना शुल्क लागू आहे, त्यांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

मात्र SC, ST, PwBD आणि महिला उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज करताना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करून शुल्क भरता येईल. पेमेंट करताना आकारले जाणारे अतिरिक्त व्यवहार शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागेल.

परीक्षेशिवाय होणार निवड

या भरतीमध्ये उमेदवारांच्या निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा स्वतंत्र परीक्षा घेतली जाणार नाही.

प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर 10वी आणि ITIमधील गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल. दोन्ही ठिकाणी मिळालेल्या गुणांची टक्केवारी विचारात घेऊन त्यांची साधी सरासरी काढली जाईल.

यानुसार उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. विभाग, युनिट, ट्रेड आणि प्रवर्गानुसार स्वतंत्र मेरिट तयार केली जाऊ शकते.

उपलब्ध प्रशिक्षण जागांच्या संख्येनुसार मेरिटमध्ये स्थान मिळालेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.

समान गुण असल्यास काय होईल?

दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांचे मेरिटसाठीचे गुण समान असल्यास वयाने मोठ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

मेरिटमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार वैद्यकीय तपासणी पूर्ण करावी लागेल.

उमेदवारांनी काय लक्षात ठेवावे?

रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ट्रेड, युनिट, पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी तपासल्यानंतरच ऑनलाइन अर्ज करावा.

अर्ज सुरू होण्याची तारीख: 7 ऑक्टोबर 2026
अर्जाची अंतिम तारीख: 6 नोव्हेंबर 2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत
एकूण अप्रेंटिस स्लॉट: 2008
निवड पद्धत: 10वी आणि ITIच्या गुणांवर आधारित मेरिट
लेखी परीक्षा: नाही
किमान शैक्षणिक पात्रता: 10वीत 50% गुण + संबंधित ट्रेडची ITI/NTC

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts