• Home
  • ताज्या बातम्या
  • भुलेश्वरच्या राजा’ची 22 फुटी मूर्ती कोसळली; 2 मृत्यू, 5 जखमी, मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Mumbai

भुलेश्वरच्या राजा’ची 22 फुटी मूर्ती कोसळली; 2 मृत्यू, 5 जखमी, मिरवणुकीत नेमकं काय घडलं?

Bhuleshwarcha Raja
2

Bhuleshwarcha Raja : मुंबईत गणेशोत्सवाची लगबग सुरू होती… ठिकठिकाणी बाप्पाचं आगमन… ढोल-ताशांचा गजर…आणि गणेशभक्तांचा उत्साह…आणि तितक्यात भुलेश्वरमध्ये एक भीषण दुर्घटना घडली… भुलेश्वरच्या राजाच्या 22 फुटी मूर्तीचा तोल गेला…आणि 2 गणेशभक्तांचा जागीच मृत्यू झाला…5 जण जखमी झाले, त्यात 5 आणि 7 वर्षाच्या दोन चिमुकल्यांचा समावेश होता. शनिवारी रात्री, 22 ऑगस्ट रोजी ही घटना घडली… आणि सर्व गणेशभक्तांसह सारा महाराष्ट्र हादरला. पाहूयात, यावरचा हा स्पेशल रिपोर्ट… नेमकं काय घडलं? का घडलं? आणि या घटनेला कोण जबाबदार? आधी हार पडला, मग 22 फुटी मूर्ती! 2 गणेशभक्तांचा मृत्यू, 5 जण जखमी; ‘भुलेश्वरच्या राजा’च्या मिरवणुकीत काय घडलं?

भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत भीषण दुर्घटना ( Bhuleshwarcha Raja )

तारीख 22 ऑगस्ट, वार शनिवार रात्रीचे 10 वाजले असतील. भुलेश्वरच्या राजाच्या 22 फुटी गणेशमूर्तीची आगमन मिरवणूक सुरू होती. ही मिरवणूक भायखळा येथून भुलेश्वरच्या दिशेनं जात होती. अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते भुलेश्वरच्या राजाच्या ( Bhuleshwarcha Raja ) आगमन मिरवणुकीत व्यस्त होते, जो तो आपल्याला दिलेली जबाबदारी पार पडत होता. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गणेशभक्तांची हू म्हणून गर्दी जमली होती. जो तो भुलेश्वरच्या राजाची 22 फुटी उंच मूर्ती पाहण्यासाठी धडपड करत होता. पुढं काय घडलं?

भुलेश्वरच्या राजाची ( Bhuleshwarcha Raja ) आगमन मिरवणूक मंडपापासून अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावर येऊन पोचली होती. भुलेश्वर, बलराम मर्चंट रोड, कबुतरखाना, जय अंबे चौक परिसरातील आपल्या मंडपात ही 22 फुटी मूर्ती विराजमान होणार होती तितक्यात… प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, अचानक गणपतीच्या गळ्यातील हार पडला, नंतर ही 22 फुटी मूर्ती हलायला लागली, तिला वाहून नेत असलेल्या ट्रॉलीचं चाक खड्ड्यात अडकलं आणि एक मोठा झटका बसला. या झटक्यानं मूर्तीचा तोल गेला आणि ती कोसळली. ही 22 फुटी मूर्ती खाली असलेल्या भक्तांवर पडली आणि या दुर्घटनेत 2 गणेशभक्तांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : कुणालच्या श्वानाची मालकासाठी प्रतीक्षा; ‘शेरा’ने अन्न-पाणी सोडलं, हृदयद्रावक दृश्य

दोन गणेशभक्तांचा मृत्यू, पाच जण जखमी ( Bhuleshwarcha Raja Ganesh Idol Accident )

या दुर्घटनेत सगळ्यात वाईट काय घडलं असेल, तर दोन निष्पाप जीव गेले… पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय संकेत नेवशे आणि 30 वर्षीय ब्रिजेश हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. रूग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या घटनेत 5 जण जखमी झाले, त्यात 5 आणि 7 वर्षे वयाच्या दोन लहान मुलींचा समावेश आहे. जखमींवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला कॉल गेला. घटनास्थळी तात्काळ मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, 108 रुग्णवाहिका, पालिकेचे कर्मचारी दाखल झाले. मूर्तीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं,
त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं आणि पोलिसांनी परिसरात बॅरिकेड लावून गर्दी नियंत्रणात आणली. अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी नागरिकांनी सांगितलेली कारणं विचार करायला लावणारी आहेत. एक म्हणजे रस्त्यावरचे खड्डे आणि दुसरं म्हणजे मूर्तीची उंची आणि वजन!

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भुलेश्वरच्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. गणेशमूर्तीला वाहून नेणाऱ्या ट्रॉलीचं चाक खड्ड्यात अडकलं आणि त्यामुळं जोराचा झटका बसला. शिवाय मूर्तीची उंची तब्बल 22 फुटी असल्यानं आणि त्यामुळं तिचं असलेलं भारदस्त वजन या कारणांमुळं या अवाढव्य मूर्तीचा तोल सांभाळणं कठीण गेलं. सर्वांत आधी मूर्तीच्या गळ्यातील हार खाली पडला आणि नंतर तिचा तोल बिघडायला सुरूवात झाली, असं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं. गणेशोत्सव म्हणजे `आनंद, उत्साह, एकता! मंडळं गणेशोत्सवाची वर्षभर तयारी करतात. मूर्तिकार महिनो न् महिने मेहनत करतात. आणि गणेशभक्त बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतात पण त्यात अशी एखादी दुर्घटना घडते आणि जिवाला चटका लावून जाते.

मंडपाजवळ अवघ्या 50 मीटर अंतरावर बाप्पा पोचला असताना ही दुर्घटना घडली हे दुर्दैवच! ज्या हातांनी बाप्पाला आणायचं होतं, त्याच हातांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना जखमींना उचलावं लागलं. ज्या दोन कुटुंबातल्या व्यक्ती गेल्या ते संकेत आणि ब्रिजेश तर मंडळाचे कार्यकर्ते होते, गणेशभक्त होते. त्यांच्या घरी आज शोककळा पसरल्याचं पाहून संपूर्ण परिसरात आज हळहळ व्यक्त होतीये.

ट्रॉली, दोर, सपोर्ट आणि मार्गाची आधी तपासणी करा ( Bhuleshwarcha Raja Mumbai )

आणि आता जाता जाता एक सांगू का, ही बातमी करताना आम्हीही हळहळलो आहोत पण दोन महत्वाच्या गोष्टी इथं आवर्जून नमूद कराव्याच लागतील. मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न दर पावसाळ्यात येतो. त्यामुळं प्रशासनाकडून गणेशोत्सव काळात रस्त्यांची पाहणी होणं अत्यंत गरजेचं ठरतं शिवाय 22 फूटी मूर्ती नेली जात असताना क्रेन, लोखंडी फ्रेम, अतिरिक्त सपोर्ट तर हवाच पण त्यासोबत भक्तांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देखील हवाच.

आणि आता सर्व गणेशभक्तांना, मंडळाच्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती करतो… सण, उत्सवात उत्साह महत्वाचा पण सर्वात आधी आपली काळजी, सुरक्षा! ट्रॉली, चाकं, दोर, हार्नेस सगळं दोनदा तपासा… लहान मुलांना ट्रॉली जवळ आणू नका.
आगमन आणि विसर्जनावेळी विशेष काळजी घ्या, ट्रॉली, रस्सी, सपोर्ट तपासा, कोणत्या मार्गावर कुठं कुठं खड्डे आहेत याची आधी माहिती घ्या. गणेशभक्तांनो, मंडळाच्या कार्यकर्त्यांनो, इतरांसोबत स्वतःचीही काळजी घ्या आणि सुरक्षित गणेशोत्सव साजरा करा हेच LS मराठीच्या वतीनं तुम्हा सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो… ज्या दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि जखमी लवकर बरे होवोत हीच भुलेश्वरच्या राजाच्या चरणी प्रार्थना!

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts