• Home
  • ताज्या बातम्या
  • कुणालच्या श्वानाची मालकासाठी प्रतीक्षा; ‘शेरा’ने अन्न-पाणी सोडलं, हृदयद्रावक दृश्य
Top News

कुणालच्या श्वानाची मालकासाठी प्रतीक्षा; ‘शेरा’ने अन्न-पाणी सोडलं, हृदयद्रावक दृश्य

Kunal Chandgude
4

Kunal Chandgude : प्राण्याला जीव लावला तर तो आपल्या कुटुंबाचा घटक होतो, आपल्या सारखेच सुख दुःख त्याला देखील असते याचे अनेक उदाहरण आज पर्यंत समोर आले आहेत. तसाच एक प्रत्यय खवल्या डोंगरावर झालेल्या दुर्घटनेत समोर आला आहे.

मालकांच्या परतीची वाट पाहतोय ‘शेरा’ ( Kunal Chandgude )

या युवकाच्या आत्महत्येच्या प्रयत्नात त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा देखील मृत्यू झाला, आईने देखील प्राण दिले. या घटनेनं त्यांच्या निकटवर्तीयांना धक्का बसला, मात्र त्यांच्या घरी असलेल्या शेरा हा श्वान देखील निराश झाल्याचं पाहायला मिळाले. सर्व कुटुंबाच उध्वस्त झाल्याने घराला असलेले कुलूप उघडण्यासाठी कोणीही तयार नाही. त्यांच्या घरात त्यांचा पाळीव शेरा मात्र अडकला आहे, त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळत आहे. इतकंच काय तर शेजारी त्याला अन्न आणि पाणी देत असले तरी ते त्याला शिवण्यास तयार नसल्याचं विदारकचित्र पाहायला मिळत आहे. पोलिस आल्याशिवाय घरचे कुलूप तोडणार कसे असा प्रश्न शेजाऱ्यांना पडल्याने तातडीने त्याला सोडवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन शेजाऱ्याने केले आहे.

घरातील माणसे गेल्याची जाणीव नसलेला चांदवडे कुटुंबातील शेरा नावाचा श्वान गेल्या ३६ तासांपासून आपल्या मालकांची आतुरतेने वाट पाहत आहे. घरात आता कोणीच नाही. मालक कुठे गेले, ते पुन्हा कधीच परतणार नाहीत, याची कल्पनाही नसलेला हा मुका जीव सतत दाराच्या दिशेने पाहत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील चांदवडे कुटुंबावर ओढवलेल्या दुर्दैवी घटनेनंतर या श्वानाची अवस्था पाहून परिसरातील नागरिकांचेही डोळे पाणावले आहेत. कुणालचा पाळीव श्वानावर विशेष जीव होता. तो दररोज सकाळी आपल्या लाडक्या श्वानाला फिरायला घेऊन जात असे. दोघांची ही रोजची सोबत आता अचानक तुटली आहे. कुणाल आणि त्याचे आई-वडील या जगात नसल्याने घरात मुका जीव उरला आहे.

हेही वाचा : घटस्फोट नाही, तरी जेवणात ‘डिवोर्स’! कपल्समध्ये का वाढतोय ‘फूड डिवोर्स’

‘शेरा’ने अन्न-पाणी सोडले आहे ! ( Shera Dog )

शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारपासून श्वान सतत जोरजोरात आवाज करत आहे. तो बेचैन असून नीट झोपतही नाही. सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे त्याने अन्न-पाणी घेणेही जवळपास बंद केले आहे. शेजाऱ्यांनी त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला; मात्र तो काहीही खाण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. कुणालसोबत दररोज बाहेर जाणारा हा श्वान आता त्याच घरात एकटाच बंद आहे. दरवाज्याकडे पाहत, कुणाल कधी येईल याची तो जणू वाट पाहत आहे.

आजोबांनी दिली बिस्किटे; आता गाभुड करणार सांभाळ
कुणालच्या मृत्यूनंतर त्याच्या पाळील श्वानाचा कोण सांभाळणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आता कुणालच्या आजोबांनी पुढाकार घेतला असून, या मुक्या जीवाची जबाबदारी बबनराव गाभुड यांनी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. आज कुणालचे आजोबा बबनराव गाभुङ यांनी त्याच्याकडे मायेने पाहत त्याला बिस्किटे दिली. आता त्यांनी त्याची जबाबदारी घेतली आहे. पण, मुक्या प्राण्याला मात्र आपल्या मालकाची आस लागली आहे.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts