पुणे : काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. दिवाळीसाठी बरेचजण गावी जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात, परंतु यंदा ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. कारण मध्य रेल्वेने 4 दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे आता 4 दिवस लोकल ट्रेन , एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहे.
मध्य रेल्वेने 11 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत कर्जत यार्ड रिमॉडेलिंग कामासाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग कामे हाती घेतली आहेत. त्यानुसार 4 दिवस मेगाब्लॉक जाहीर कऱण्यात आला आहे. यामुळे मुंबई विभागातील मेल, एक्स्प्रेस तसेच लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम दिसून येणार आहे. यासह प्रवाशांची गैरसोय होण्याचेही प्रमाण जास्त आहे.
मध्य रेल्वेचा हा मेगाब्लॉक पळसधरी ते भिगवण चौक या विभागादरम्यान शनिवारी 11 ऑक्टोबर रोजी 12.20 वाजेपासून रविवारी 12 ऑक्टोबर रोजी 18.20 मिनिटांपर्यंत सुरु राहील. तर सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी 11.20 ते 2.20 पर्यंत, आणि मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी 11 वाजून 20 मिनिटांपासून ते 2.20 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे बऱ्याच गाड्या रद्द कऱण्यात आल्या आहे. यामध्ये प्रगती एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस,इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आह. या गाड्या शनिवारी धावणार होत्या. तेर प्रगती एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, वंदे भारत, इंद्रायणी, इंटरसिटी, डेक्कन एक्सप्रेस या रविवारी धावणाऱ्या गाड्या रद्द कऱण्यात आल्या आहे.
मेगाब्लॉक असलेल्या चार दिवस बऱ्याच महत्वाच्या गाडयांना पनवेल– कल्याण –कर्जत, दिवा पनवेल रोहा किंवा मनमाड दौड कोरड लाईन या मार्गावरून वळवण्यात येणार आहे. यात पनवेल नांदेड एक्सप्रेस, सीएसएमटी–नागरकोईल एक्सप्रेस, इंदूर लिंगमपल्ली एक्सप्रेस, हुबळी दादर एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. तर रविवारी सीएसएमटी-नांदेड वंदे भारत, पुणे-सीएसएमटी यासारख्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
जर तुम्ही मेगा ब्लॉक च्या 4 दिवसांच्या कालावधीत नेरळ – कर्जत आणि खोपोली जाणार असाल तर या मार्गावरील लोकल सेवा बंद असणार आहे. याबाबत नोंद घ्यावी असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.