नोकरी पेशापेक्षा बिजनेसकडे आजकाल जास्त कल दिसून येत आहे. सर्व सामान्य घरातील लोकांना देखील छोटा मोठा बिझनेस उभारण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया, गुगल, विकिपीडिया आणि बातम्यांच्या माध्यमातून छोट्या मोठ्या बिजनेस आयडिया ची माहिती मिळत असते. आणि या आयडिया मधून जोरदार कमाई देखील होऊ शकते.
बिझनेस टाकायचा म्हटलं तर त्यासाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा, इन्व्हेस्टमेंट कशी करणार, बिझनेस चालेल की नाही यासारखे प्रश्न निर्माण होतात. पण असे बरेच बिझनेस आहे ज्यामध्ये आपण कमी गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा मिळवू शकतो. जेणेकरून आपला बिजनेस फायद्यात राहील. त्यापैकी एक असलेला बिझनेस म्हणजे स्टेशनरी बिझनेस.
वर्षभर स्टेशनरी प्रॉडक्टची मागणी मोठ्या प्रमाणात असते. शाळेसाठी लागणारे साहित्य, वह्यापुस्तक, पेन, ड्रॉइंग बुक, स्केचपेन हे सर्व साहित्य अत्यावश्यक आहे. ज्यामुळे तुमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू शकतो. यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
स्टेशनरी प्रॉडक्टची मागणी पाहता तुम्ही हा व्यवसाय करू इच्छित असाल तर, तुम्हाला सर्वात चांगले आणि योग्य असे लोकेशन शोधणे गरजेचे आहे. शाळा कॉलेज च्या बाहेर स्टेशनरी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. त्याच हिशोबाने तुम्ही तुमच्या बिझनेस साठी लोकेशन शोधू शकतात.
स्टेशनरी प्रॉडक्टचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला 50 ते 60 हजार रुपये लागतील. त्याचबरोबर तुम्ही यापेक्षाही कमी खर्चात हा बिझनेस करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या दुकानात ग्रीटिंग कार्ड, शुभेच्छा कार्ड देखील ठेवू शकतात.
हे हि वाचा : अमूल फ्रेंचाईजी हा बिजनेस केल्यास, कमी गुंतवणुकीत मिळू शकतो जास्त फायदा
जर तुम्ही तुमच्या स्टेशनरी दुकानात ब्रँडेड प्रॉडक्ट ठेवणार असाल तर त्या प्रॉडक्ट वर तुम्ही 30 ते 40 टक्के बचत करू शकतात. आणि लोकल प्रॉडक्ट वर तुम्ही 2-3 टक्के बचत करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही स्टेशनरी वस्तू होलसेल दरात विकत घेऊन किरकोळ किमतीत विकू शकतात. त्यामुळे तुमचा बिजनेस वाढू शकतो.
तुम्ही करू इच्छित असलेला स्टेशनरी दुकान छोट्या शहरांमध्ये जास्त प्रमाणात चालू शकतो. त्याचबरोबर तुम्ही शाळेसोबत टाई अप करून मुलांसाठी अभ्यासक्रमा संबंधित पुस्तकं उपलब्ध करू शकतात. जेणेकरून तुमचा बिझनेस वाढू शकेल. यासोबतच तुम्हाला मार्केटिंग करणे सुद्धा गरजेचे आहे.