जैसलमेर (राजस्थान ) : जिल्ह्यातील जैसलमेर-जोधपूर रस्त्यावरील आर्मी वॉर म्युझियमजवळ मंगळवारी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसला आग लागली. या घटनेत 20 प्रवासी ठार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झालेत. जिल्हाधिकारी प्रताप सिंह यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित मदत आणि वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले. अपघातात गंभीर झालेल्या प्रवाशांना जोधपूरमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे.
पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
खासगी बस मंगळवारी दुपारी 3च्या सुमारास जैसलमेरहून दिल्लीच्या दिशेनं निघाली. बहुतेक प्रवासी जोधपूरला जात होते. मार्गावर सुमारे 20 किलोमीटर अंतरावर थैयत गावाजवळील आर्मी वॉर म्युझियमच्या परिसरात बसला अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि लष्कराच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाची पथकं पोहोचली. आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही.
हे हि वाचा : आंध्र प्रदेशात फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग; 7 जणांचा जळून मृत्यू
आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे अथक प्रयत्न : घटनास्थळावर दाखल झाल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. त्यापूर्वी लष्कराचे अधिकारी, सैनिक आणि सैन्याचं अग्निशमन दल घटनास्थळी पोहचलं. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
#WATCH | Rajasthan CM Bhajanlal Sharma visits the spot where a Jaisalmer-Jodhpur bus burst into flames, claiming the lives of 20 people.
(Source: CMO) pic.twitter.com/6w8w5cVqLl
— ANI (@ANI) October 14, 2025
जखमींवर उपचार सुरू
घटनेनंतर पाच रुग्णवाहिकांच्या सहाय्यानं सर्व जखमी प्रवाशांना सरकारी रुग्णालयात दाखल केलं. या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. तसंच या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. तसंच घटनेची माहिती मिळताच जैसलमेरचे जिल्हाधिकारी प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक अभिषेक शिवहरे आणि एसडीएम सक्षम गोयल यांच्यासह जिल्हा प्रशासन, पोलीस आणि सैन्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.