Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • टीपू सुलतानवरून पुण्यात भाजप-काँग्रेसमध्ये दडगफेक, अनेक कार्यकर्ते आणि पत्रकारही जखमी
Top News

टीपू सुलतानवरून पुण्यात भाजप-काँग्रेसमध्ये दडगफेक, अनेक कार्यकर्ते आणि पत्रकारही जखमी

BJP-Congress clash over Tipu Sultan in Pune

BJP-Congress clash : काँग्रेस प्रदेशाध्यप हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या वक्तव्यानंतर पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन येथे आंदोलन केल्याची घटना घडली. आंदोलनादरम्यान काँग्रेस भवनवर दगडफेक झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला असून, या दगडफेकीत अनेक कार्यकर्त्यांसह काही पत्रकारही जखमी व रक्तबंबाळ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असून, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित तक्रार विश्रामबाग पोलीस ठाणे तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. यावेळी काँग्रेस नेते मोहन जोशी आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी तीव्र भूमिका घेतली. भाजपकडून गुंडागर्दी केली जात असून, जबाबदारांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

धीरज घाटे यांच्या तक्रारीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याचा आरोप झाल्यानंतर पुण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं. या वक्तव्यानंतर भाजपने तीव्र प्रतिक्रिया देत मध्यरात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या तक्रारीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. यामध्ये दुष्यंत मोहळ धिराज घाटे, नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी सहभागी झाले होते.

इट का जवाब हम पत्थर से देंगे – भाजप

दरम्यान, “इट का जवाब हम पत्थर से देंगे” अशा घोषणांनंतर काँग्रेसचे युवा कार्यकर्तेही आक्रमक झाले. क्षणातच आंदोलनाचं रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झालं. या गोंधळात काँग्रेस आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले, तर काही पत्रकारांनाही मारहाणीचा फटका बसला. भाजप कार्यकर्ते शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत असतानाच, काँग्रेस कार्यकर्त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं. “जोपर्यंत एकमेकांविरोधात गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही,” अशी भूमिका दोन्ही पक्षांनी घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी घटनास्थळी भेट देत कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

आता खरा प्रश्न असा आहे की –

– काँग्रेस शहराध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल होणार का?
– भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावरही कारवाई होणार का?
– आणि या दगडफेकीप्रकरणी नेमकी जबाबदारी कोणाची ठरणार?
या सर्व प्रश्नांची उत्तरं सध्या तरी गुलदस्त्यात असून, पुणे पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts